Horoscope | गुढीपाडव्या दिवशी होत आहे बुध गोचर; ‘या’ राशी होतील मालामाल

Horoscope
Horoscope
Published on
Updated on

बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे. इतर सर्व ग्रहांच्या तुलनेत बुध लहान आहे. बुध हा ग्रह बुद्धी आणि ज्ञानाचा कारक ग्रह मानला जातो. बुधाच्या आशार्वादाने लोकांना जीवनात बरेच लाभ मिळतात. बुध बळकट असेल तर आपली समज, विचार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, उद्योगात प्रगती होते. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रह जेव्हा गोचर करतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर होत असतो. ९ एप्रिलला बुध मीन राशीत गोचर करत आहे. या गोचरच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य चमकणार आहे आणि त्यांना सर्व क्षेत्रात यश मिळणार आहे. ख्यातनाम ज्योतिष चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊ या राशी कोणत्या आहेत.

मेष

बुध ग्रहाचे मेष राशीतील गोचर मेष राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम देईल. मेष राशीत हे गोचर चौथ्या स्थानी होत आहे, त्यामुळे तुम्हाला वाहन आणि संपत्तीची प्राप्ती होईल. वडिलार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जे लोक स्थावर मालमत्ता, संपत्ती, जमीनशी संबंधित व्यवहार यात कार्यरत आहेत, त्यांना फार चांगल्या प्रकारे धनलाभ होईल.

वृषभ

बुध गोचर व्यवासायिकांसाठी बरेच लाभ घेऊन येईल. गोचर काळात तुम्हाल पैसे मिळवण्याची संधी मिळेल. कष्ट आणि बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला व्यवासाय विस्ताराची संधी मिळेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. नोकदार व्यक्तींना वरिष्ठांचे पाठबळ मिळेल.

मिथुन

बुध गोचरमुळे तुमची आर्थिक बाजू सुधारेल. बऱ्याच दिवसांपूर्वी उधार दिलेले पैसे हाती येतील. तुमच्याकडे बोलण्याचे कौशल्य आहे, त्यामुळे तुम्ही प्रतिकूल परिस्थितीला उत्तम प्रकारे तोंड द्याल. कपडे, दागिने, चैनीच्या वस्तू यावर जास्त खर्च होईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील आणि पाहुण्याचे आगमन होईल. विवाहविषय बोलणी यशस्वी होतील. आरोग्याची काळजी घ्यावी. त्वचा किंवा पोटाशी संबंधित समस्या होतील.

कर्क

बुध ग्रहाचे मीन राशीतील गोचर कर्क राशीसाठी भविष्यात शुभ काळ दर्शवत आहे. जीवनाच्या विविध पैलूंवर सकारात्मक परिणाम दिसतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल, त्यामुळे तुम्ही आव्हानांचा सामना कराल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाळी सकारात्मक बदल होतील, आणि करिअरमध्ये प्रगती होईल.

सिंह

बुध ग्रहाच्या गोचरमुळे तुमची धावपळ वाढेल आणि खर्चही वाढतील. तुम्हाला सरकारकडून एखादी नोटीस येऊ शकते, त्यामुळे व्यवहारात काळजी बाळगा. मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. जर तुम्ही व्हिसासाठी अर्ज करत असाल तर ग्रहदशेचा लाभ होईल. परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ शुभ आहे.

कन्या

बुध गोचर काळात तुम्हाला चढउतारांचा सामना करावा लागेल. हा काळ शुभ म्हणता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या बद्दल फार काळजीपूर्वक राहिले पाहिजे. औषधांची रिअॅक्शन येऊ शकते. वैवाहिक जीवनात कटुता येऊ देऊ नका. या काळात भागीदारीत व्यापार करू नका. कराराच्या कागदपत्रांवर सही करताना काळजी घ्या.

तूळ

बुध गोचर तुमच्या जीवनात बरेच बदल घडवून आणेल. तुम्ही नोकरीत बदल करू शकता आणि नव्या जागी जाऊ शकता, याचा तुम्हाला आर्थिक आणि पदाच्या दृष्टीने लाभ होईल. तुम्हाल तुमच्या जुन्या नोकरीतही पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळेल. आयातनिर्यातीच्या व्यवसायात असलेल्यांसाठी हा सुवर्ण काळ ठरेल. काम आणि वैयक्तिक जीवनात ताळमेळ राहील.

वृश्चिक

बुध ग्रहाच्या गोचरमुळे भाग्य वृद्धी होईल आणि तुमचा धर्म, आध्यात्म यातील रस वाढेल. प्रवास आणि दानधर्म यावर खर्च होईल. तुम्ही घेतलेले निर्णय आणि कृती यांचे कौतुक होईल. घरी मंगलकार्याचे आयोजन होईल. पाहुण्याच्या आगमनामुळे घरातील वातावरण चांगले राहिल. लहान भावांसोबत मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.

धनू

बुध गोचरमुळे तुमच्या उत्पन्नात सुधारणा होईल. तुमच्या इच्छापूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या करिअरबद्दल समाधानी असाल. परदेशात काम करण्याची संधी मिळेल. पगारवाढीच्या संधी आहेत, आणि कुटुंबात आनंद येईल. प्रकृती चांगली राहील. प्रेमसंबंधांना पुढे नेण्यात यशस्वी व्हाल.

मकर

बुध गोचरचा सकारात्मक परिणाम तुमच्या वैयक्तित जीवनावर होईल. अंरतिक ऊर्जा चांगली राहील. घरी काही मंगलकार्यांचे आयोजन होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. व्यापारातून चांगला पैसा मिळेल. या काळात तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये नशिब आजमावाल आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात बरेच सकारात्मक बदल होतील.

कुंभ

ग्रहदशेतील बदलांचा थेट प्रभाव तुमच्या राशीवर पडेल. तुम्हाला नवे लोक भेटतील आमि तुम्ही त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. आरोग्याची साथ लाभेल. जोडीदाराशी चांगला ताळमेळ राहील. काही अज्ञाता स्रोतांतून चांगले पैसे मिळतील त्यामुळे कुटुंबात आनंद राहील.

मीन

बुध गोचर तुमच्या राशीला फार चांगले राहील, असे म्हणता येणार नाही. प्रकृतीवर नाकारात्मक परिणाम दिसून येईल तुम्ही कोणाला तरी उधार रक्कम द्याल आणि ती तुम्हाला वेळेत परत मिळणार नाही. गुप्तशत्रूंपासून सावध राहा, आणि कायदेशीर बाबी कोर्टाच्या बाहेर सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रवासातून लाभ होईल. परदेशी कंपन्यांसाठी तसेच नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news