राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी चंद्रपुरात पुढाकार घेत 17 सप्टेंबरला हजारो ओबीसी बांधवांच्या उपस्थिती महामोर्चा काढून आक्रोश व्यक्त केला होता. आज गांधी चौक राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाद्वारे गेल्या दहा दिवसापासून सूरू असलेल्या ओबीसी बंधू रविंद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्याकरीता नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयाची होळी केली. टोंगे यांचा आजचा अन्नत्याग आंदोलनाचा दहावा दिवस आहे. यावेळी मनीषा बोबडे, गोमती पाचभाई, कुसुमताई उदार, मीनाक्षी गुजरकर, सरिता लोंढे, सुनीता काळे, प्रभा साळवे, सविता वैरागडे, ममता क्षीरसागर, सुलभा जक्कुलवार, रीना येरणे, कविता वैरागडे, सरला झाडे,रीना त्रिवेदी, रूपा जुमडे,सरोजिनी वैद्य,मनीषा यामावार,कल्पना यामावार,किरण पावसकर,माया चौधरी, रजनी गोखले,चंदाबाई सोरते,, स्नेहल चौधडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.