हिंगोली ; टेम्‍पो पुलावरून खाली कोसळला, चालक जागीच ठार

टेम्‍पो पुलावरून खाली कोसळला
टेम्‍पो पुलावरून खाली कोसळला

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा कुरुंदा ते डोंगरकडा मार्गावर रेडगाव शिवारात केळी घेऊन जाणारा टेम्पो पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. नंदू बाळकृष्ण मानकर (रा. नागपूर) असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागपूर येथील जयताळा भागातील नंदू मानकर हे कुरुंदा येथून केळी घेऊन जाण्यासाठी टेम्पो घेऊन आले होते. शुक्रवारी दिवसभर कुरुंदा शिवारातून केळी भरल्यानंतर सायंकाळच्या सुमारास टेम्पो घेऊन परत नागपूरकडे निघाले होते. यावेळी कुरुंदा ते डोंगरकडा मार्गावर रेडगाव शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पुलावरून खाली कोसळला. या अपघातात नंदू यांचा जागीच मृत्यू झाला, तर केळीचे कॅरेट अस्ताव्यस्त झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे, गजानन सरकटे, गावकरी बाजीराव सवंडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकास टेम्पोच्या बाहेर काढले. त्यांच्या खिशामध्ये आधारकार्ड सापडले असून त्यामध्ये नंदू बाळकृष्ण मानकर (रा. जयताळा रोड, महाजन ले आऊट नागपूर) असे नांव असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा मृतदेह नंदू यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंद झाली नाही.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news