हिंगोली ; जरांगेंची व्हिडिओ कॉलवरून मध्यस्‍थी अन् गिरगांव फाट्यावरचे आंदोलन मागे

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील

गिरगांव ; पुढारी वृत्तसेवा वसमत तालुक्यातील गिरगांव व गिरगांव सर्कलच्या वतीने दि.१६ फेब्रुवारी रोजी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गिरगांव फाट्यावर बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. काल (दि.१७ फेब्रुवारी) रोजी या आंदोलनाचा दुसरा दिवस उजाडला तरी पण आंदोलक आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुपारनंतर प्रशासनाच्या वतीने आंदोलकांशी चर्चा करुन तुर्तास हे आंदोलन थांबवावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

या चर्चेसाठी अप्पर पोलीस अधीक्षक मा.अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार श्रीमती शारदा दळवी, पोलिस सहायक गजानन मोरे हिंगोली, वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक काचमांडे, गिरगांव मंडळ अधिकारी प्रियंका खडसे व इतर कर्मचारी उपस्थित होते. बराच वेळ चर्चा होऊनही आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर आंतरवाली सराटी येथील सरपंच पांडुरंग तारख यांनी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉलव्दारे आंदोलकांशी संवाद सांधुन दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिल्‍यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

गिरगांव येथील मराठा आंदोलकांनी वसमत – नांदेड रोड वरील गिरगांव फाट्यावर गेले दोन दिवसांपासून बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरू ठेवले होते. अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच २० तारखेपर्यंत सरकारने सर्व मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा याच ठिकाणी २३ तारखेपासुन संविधानीक व शांततेच्या मार्गाने बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन देऊन हे बेमुदत रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news