Hepatitis : ‘हिपेटायटिस’चे प्रकार आणि कारणे जाणून घ्‍या सविस्‍तर

Hepatitis : ‘हिपेटायटिस’चे प्रकार आणि कारणे जाणून घ्‍या सविस्‍तर
Published on
Updated on

यकृतावर सूज आल्यास त्याला हिपेटायटिस अर्थात कावीळ असे म्हणतात. हा आजार होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये वेगवेगळी औषधे, अल्कोहोल आणि काही खास प्रकारच्या आरोग्य समस्या यांचा समावेश असतो. बहुतेक बाबतीत हिपेटायटिस  (Hepatitis)  अर्थात कावीळ हा आजार विषाणूंमुळे होतो, ज्यामुळे यकृताचे नुकसान होते. हा आजार अ, ब आणि क या प्रकारात होतो.

Hepatitis : वर्षांपर्यंत या आजाराचे कुठलेही लक्षण दिसत नाहीत

लक्षणे : अनेकदा सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात कुठलेही लक्षण दिसत नाही; मात्र संसर्ग झाल्यानंतर या आजाराच्यी तिन्ही प्रकारांत अशक्तपणा, चक्कर येणे, भूक कमी होणे, पोटात दुखणे, बारीक ताप, त्वचा आणि डोळ्यांमध्ये पिवळेपणा अशी लक्षणे दिसतात. ज्यावेळी हिपेटायटिस बी आणि सी हा प्रकार क्रॉनिक होतो तेव्हा जवळपास एक वर्षांपर्यंत या आजाराचे कुठलेही लक्षण दिसत नाही; मात्र काळासोबत कुठलीही सूचना न देता लिव्हर आधीच डॅमेज झालेले असते.

Hepatitis  'ए' वेगाने पसरणारा संसर्ग

हिपेटायटिस ए :  हा वेगाने पसरणारा संसर्ग असतो. सामान्यपणे हा प्रकार व्यक्तीला थोड्या प्रमाणात आजारी बनवतो. अनेकांना आपण आजारी आहोत हे समजतही नाही. हा विषाणू काही काळानंतर आपोआप जातो आणि लिव्हरला कुठलीही हानी पोहोचत नाही. हिपेटायटिस ए हा प्रामुख्याने संक्रमित अन्न अथवा पाण्यापासून पसरतात. संक्रमित व्यक्तीच्या मलाद्वारेदेखील हा आजार पसरतो. न धुतलेल्या भाज्या, फळे, अर्धवट शिजवलेले अन्न ही काही सामान्य कारणे आजार पसरवू शकतात. डे केअर सेंटरद्वारेदेखील हा आजार पसरण्याची शक्यता असते. तेथील कर्मचारी लहान मुलांचे डायपर बदलल्यानंतर हात धुवत नसतील, तर त्यांना धोका असतो. अधिक प्रवास करणार्‍या लोकांनादेखील त्याचा धोका असतो. प्रवासादरम्यान बाहेरचे कच्चे अन्न खाल्ल्यामुळे किंवा दुषित पाण्यामुळे याचा धोका वाढतो.

हिपेटायटिस 'बी'चा प्रभाव मुलांमध्‍य दीर्घकाळापर्यंत राहतो 

हिपेटायटिस बी :  ज्या लोकांना हा आजार होतो त्यांच्यात अतिशय अल्प लक्षणे दिसतात. ही लक्षणे काही दिवसांत आपोआपच बरी होतात; मात्र काही लोकांमध्ये याचा संसर्ग शरीरातून जात नाही. त्याचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत राहतो. 90 टक्के मुलांमध्ये ज्यावेळी या विषाणूंचा संसर्ग होतो तेव्हा तो दीर्घकाळ राहतो. क्रॉनिक हिपेटायटिस बीमध्ये लिव्हर डॅमेज, लिव्हर फेल्युअर, लिव्हर कॅन्सर यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

हे संक्रमण व्यक्तीचे रक्त, बॉडी फ्लूईड आणि असुरक्षित शारीरिक संबंध यांमुळे होते. अनेकदा हे संक्रमण संक्रमित व्यक्तीची सुई, रेझर किंवा टुथब्रश यांसारख्या वस्तूच्या वापरामुळे देखील पसरतेे. हा आजार आईकडून गर्भातील बाळालाही होऊ शकतो; मात्र गळाभेट, हस्तांदोलन किंवा सोबत जेवल्याने तसेच खोकल्याने पसरत नाही.

हिपेटायटीस 'सी'मुळे अनेक गंभीर समस्या होऊ शकतात

हिपेटायटीस सी : सुमारे 25 टक्के लोक हिपेटायटिस सीच्या विषाणूंच्या संसर्गापासून बाहेर पडतात; पण बहुतेक लोकांमध्ये हा विषाणू दीर्घकाळ राहतो. क्रॉनिक हिपेटायटिस सीच्या अवस्थेत अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. यामध्ये लिव्हर फेल्युअर, लिव्हर कॅन्सर याचीही शक्यता असते. यातील चांगली गोष्ट म्हणजे, या विषाणूंवर उपचार करता येतात आणि लिव्हरवर होणारा याचा परिणाम कमी करता येतो. हिपेटायटिस एफ पासून बचाव करण्यासाठी आपले हात वारंवार धुवत राहावेत. बी आणि सीच्या स्थितीत आपल्या वैयक्तिक वस्तू म्हणजे नेलकटर, रेझर, टुथ ब—श यासारख्या वस्तू दुसर्‍यांना देऊ नयेत. घरातील प्रत्येक व्यक्तीने हिपेटायटीस बीची लस टोचून घ्यावी. ए आणि बी दोन्ही प्रकारची लस उपलब्ध असून लहानपणीच हे लसीकरण करून घ्यावे.

– डॉ. संतोष साळुंखे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news