![हेमा मालिनी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2F%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
भोपाळ ः मध्य प्रदेशातील एका कॅबिनेट मंत्र्यांनी टपाल खात्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. टपाल खात्यामधील गुंतवणुका वाढविण्यासाठी हेमामालिनी यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्याची सूचना टपाल विभागाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांनी दिली.
खांडवा येथे टपाल सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मी हेमामालिनी यांचा चाहता आहे. भारतीय संस्कृती, सभ्यतेच्या त्या प्रतीक आहेत. त्यांचे चित्रपट पाहून दर्शकांना कधीच तोंड लपवावे लागत नाहीत. त्यांनी मथुरेमधून संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. खासदार म्हणूनही त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती झाल्यास गुंतवणूक वाढण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.