Health Insurance : आरोग्य विम्याचा लाभ न घेतल्यास…

Health Insurance
Health Insurance
Published on
Updated on

आपण एखादा आरोग्य विमा घेतला आहे, असे समजा. या विम्यापोटी आपण वर्षभराचा हप्ता भरलेला आहे; पण या काळात आजारी पडला नाहीत, दवाखान्यात दाखल होण्याची आवश्यकता पडली नाही किंवा कुटुंबीयांसाठी कोणत्याही प्रकारचा दावा केला नाही, तर अशा वेळी विमा कंपनी पॉलिसीधारकास काही आर्थिक लाभ देते. या लाभाला 'नो क्लेम बोनस' असे म्हटले जाते. ( Health Insurance )

संबंधित बातम्या 

आपण जेव्हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करतो तेव्हा काहीतरी गिफ्ट, ऑफर किंवा डिस्काऊंटची अपेक्षा करतो. मग, विम्याचा विचार होतो तेव्हा या आघाडीवर आपण कसे मागे राहू शकतो? हेल्थ इन्श्युरन्सचा विचार केल्यास आपल्याला नो क्लेम बोनसपोटी आर्थिक लाभ दिला जातो. नो क्लेम बोनस हे एक प्रकारचे रिवॉर्ड असून, ते वर्षभरात दावा न करणार्‍या पॉलिसीधारकास विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येते.

विमा घेतल्यापासून वर्षभरापर्यंत कोणताही दावा झालेला नसेल, तर विमा कंपनीकडून 'नो क्लेम बोनस' देण्यात येतो. या आर्थिक सवलतीचे दोन अर्थ निघतात. एक तर विमा कंपनी पॉलिसीधारकांचा विमा कवच वाढवते किंवा हप्त्यावर सवलत देते. या दोन्ही गोष्टी पॉलिसीधारकांसाठी फायद्याच्या आहेत. म्हणून आरोग्य विमा घेताना नो क्लेम अधिकाधिक देणार्‍या विमा कंपनीचा विचार करायला हवा कारण पॉलिसीच्या काळात आपण फिट आहात आणि आरोग्य विमा पॉलिसीवर कोणत्याही प्रकारचा दावा केलेला नाही, असे गृहीत धरले जाते.

आरोग्य विम्यासाठी दोन प्रकारचे नो क्लेम बोनस आहेत. एक म्हणजे हप्त्यावर सवलत आणि दुसरे म्हणजे संचयी लाभ (कम्युलेटिव्ह बेनिफिट्स).

हप्त्यावर सवलत

नो क्लेम बोनसच्या सुविधेनुसार विमा कंपनी जर एका वर्षात ग्राहकांकडून कोणताही दावा केला गेला नसेल, तर दुसर्‍या वर्षी हप्ता भरताना रकमेत सवलत देते. याचाच अर्थ, आपल्याला एकाच प्रकारच्या विमा योजनेपाटी भरण्यात येणार्‍या रकमेत सवलत दिली जाते. उदा. आपण दहा लाखांचा विमा उतरवला असेल आणि एक आरोग्य विमादेखील घेतला असेल, तर त्यासाठी दहा हजार रुपये भरले आहेत, असे समजा.

त्यावर्षी विमाकर्त्याकडून कोणताही दावा केला गेला नाही, तर पुढच्या वर्षीचा हप्ता भरताना पाच टक्के सवलत दिली जाते. याला नो क्लेम बोनस असे म्हणतो. म्हणजे पुढच्या वर्षी दहा हजार रुपयांऐवजी 9500 रक्कम भरावी लागेल आणि त्याचवेळी विम्यावर मिळणारे लाभ आणि विमा कवच कायम राहतो. यात बदल होत नाही.

संचयी लाभ

संचयी नो क्लेम बोनसनुसार विमा कंपनी हप्ता कायम ठेवत प्रत्येक क्लेम फ्री इअरसाठी विमा पॉलिसीचे कवच वाढविते. यासाठी उदाहरण पाहू. आपल्याला विमा कंपनीकडून पाच टक्के संचयी लाभ प्रदान केला असेल, असे समजा. यानुसार पुढच्या वर्षी विमा कवचची रक्कम वाढत ती 10.5 लाख रुपये असेल आणि हप्ता मात्र दहा हजार रुपयेच राहील. आरोग्य विमा नो क्लेम बोनसच्या कमाल मर्यादेपर्यंत मिळतो. अर्थात, दोन विमाधारकांचा नो क्लेम बोनस किंवा लाभ वेगळे राहू शकतात.

साधारणपणे संचयी लाभ हा 50 ते 100 टक्क्यांच्या मर्यादेपर्यंतच दिला जातो. आपण अनेक वर्षांपर्यंत कोणताही दावा केला नाही, तर आपल्या पॉलिसीची रक्कम ही कमाल 50 ते 100 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. हप्त्यात सवलत घेण्याचाही आपल्याला अधिकार आहे. हप्त्याची रक्कम ही कमाल 50 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. 'नो क्लेम क्लेम बोनस'ला मेडिक्लेम पॉलिसीत ट्रान्स्फर करता येऊ शकते. म्हणजे आपण एखाद्या नवीन विमा योजनेत किंवा विमा कंपनीकडे जात असू, तर एखाद्या विशेष विमा पॉलिसीवर मिळालेल्या बोनसला नव्या पॉलिसीत ट्रान्स्फर करता येऊ शकते.

अर्थात, देशातील प्रत्येक विमा कंपनी आरोग्य विमा घेण्यावर नो क्लेम बोनस देतेच असे नाही. त्यामुळे पॉलिसी खरेदी करताना संबंधित कंपनी बोनस देते की नाही, याची तपासणी करायला हवी. (Health Insurance)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news