कांद्याचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पातीचा कांदा, ज्याचा तीव्र वास येत नाही आणि हिरवी पात आणि पांढरा कांदा खाऊ शकतो आणि दुसरा म्हणजे, लाल कांदा ज्याला तीव्र वास असतो आणि त्याच्या वरचं आवरण हे कोरडं असतं. (Health Benefits of Onions)
संपूर्ण जगामध्ये वर्षभर अनेक आकाराचे, प्रकाराचे कांदे आणि त्यांचे प्रकार आढळतात. कांदापात ही कुरकुरीत, हिरवीगार असून त्याच्या शेंड्याला पांढरा कांदा असतो. कांदापातीच्या हिरव्या भागापासून व्हिटॅॅमिन सी आणि बीटा कॅरेटीन मिळते. एक कप उकळलेल्या कांद्यापासून 225 मिलिग्रॅम पोटॅशियम मिळते. कांद्याविषयीचे पूर्वीचे संशोधन आणि समज हे आजच्या युगात पडताळून पाहिले असता, ते बरेचसे खरे आढळतात. पूर्वीच्या लोकांनी कांद्याला हृदयाचे टॉनिक असे म्हटले आहे.
नवीन संशोधनाप्रमाणे कांद्यात असलेला अॅडिनोसीन पदार्थ हा रक्ताची गुठळी होऊ देत नाही. त्यामुळे हार्ट अटॅकपासून बचाव होऊ शकते. अन्य काही अभ्यासांनुसार, योग्य प्रमाणात कांदा खाणार्या व्यक्तीला उच्च रक्तदाब होत नाही. कांद्यातील सल्फर हा एक असा घटक आहे की, ज्याच्यामुळे कांदा कच्चा खाल्ला की, खूप उग्र वास येतो, तरीसुद्धा या सल्फरमुळे कॅन्सर होणार्या काही घटकांपासून, कार्सिनोजेन्सपासून संरक्षण मिळते. त्याचबरोबर कांद्यात असे काही पदार्थ आहेत जे सूक्ष्म रोगजंतूंचा नाश करतात. (Health Benefits of Onions)