Haryana Violence Fact Check : हरियाणात नलहेश्वर मंदिरात महिलांवर लैंगिक अत्याचार? जाणून घ्या, वस्तुस्थिती

Haryana Violence Fact Check
Haryana Violence Fact Check

पुढारी ऑनलाइन डेस्क : Haryana Violence Fact Check : हरियाणातील नूह येथे 31 जुलैपासून हिंसाचार उफाळला. त्याचा परिणाम जवळील गुरुग्राम आणि अन्य शहरातही झाला. दरम्यान, समाज माध्यमांवर कालपासून नूह हिंसाचारादरम्यान नलहेश्वर मंदिरात महिलांसोबत लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचा संदेश फिरत आहे. मात्र, हरियाणा पोलिसांनी या दाव्यांचे पूर्णपणे खंडन करून त्याला अफवा आणि खोटे कथन म्हटले आहे.

Haryana Violence Fact Check : अशी कोणतीही घटना घडली नाही

याविषयी अधिक माहिती देताना अतिरिक्त पोलिस महानिदेशक एडीजीपी ममता सिंह म्हणाल्या, हिंसाचारादरम्यान अशी कोणतीही घटना घडलेली नाही. समाजमाध्यमांवर सध्या हे खोटे कथानक पसरवण्यात येत आहे की नल्हेश्वर मंदिरात आश्रय घेतलेल्या महिलांवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. मात्र, ही एक खोटी अफवा आहे. एक खोटे कथानक समाज माध्यमातून पसरवण्यात येत आहे. मी घटनास्थळी उपस्थित होते, अशी कोणतीही भयावह घटना घडलेली नाही.

अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार

त्या पुढे म्हणाल्या की, मी हे अधिकृतपणे सांगत आहे कारण मी पूर्ण घटनेदरम्यान उपस्थित होते. कोणत्याही महिलेसोबत असे काहीही घडलेले नाही. तिथे वास्तवात काय घडले हे आम्ही यापूर्वीच सांगितले आहे. तसेच अशा अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध अतिशय कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Haryana Violence Fact Check : 216 जणांना अटक

ते म्हणाले की, राज्यातील हिंसाचाराशी संबंधित घटनांप्रकरणी 216 जणांना अटक करण्यात आली आहे. एडीजीपी म्हणाले, "राज्यात 216 लोकांना अटक करण्यात आली आहे आणि यापैकी 83 प्रतिबंधात्मक अटक आहेत."

हरियाणाचे डीजीपी काय म्हणाले?

दरम्यान, हरियाणाचे डीजीपी पीके अग्रवाल म्हणाले, "मी येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तपासाला गती मिळावी आणि कायदा व सुव्यवस्था राखता यावी यासाठी नोंदवलेली प्रकरणे, तपास आणि कायदा व सुव्यवस्थेच्या इतर समस्यांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. येथे 145 जणांना अटक करण्यात आली असून 55 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news