नवरी मिळे हिटलरला : नजरेत याच्या धार शिस्त याची फार; हँडसम राकेश बापटची धमाकेदार एन्ट्री

नवरी मिळे हिटलरला
नवरी मिळे हिटलरला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढविणारा, हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरा 'राकेश बापट' लवकरच 'नवरी मिळे हिटलरला' या नवीन मालिकेतून झी मराठीवर पदार्पण करणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने राकेश बापट प्रथमच एका मराठी डेलीसोप दिसणार आहे.

संबंधित बातम्या 

चाहत्यांनी टिझरमध्ये पाहिलेच असेल की, राकेश AJ ची म्हणजेच अभिराम जहागीरदारची भूमिका साकारणार आहे. AJ ओळखला जातो तो म्हणजे, मिस्टर परफेक्टशनिस्ट. ज्याचं व्यक्तिमत्व आहे डॅशिंग, अतिशय शिस्तबद्ध, आणि वक्तशीरपणामुळे. ज्यामुळे त्याला "हिटलर" हे टोपणनाव मिळाले आहे. AJ साठी नवरी शोधण्याची मोहीम त्याच्या सुनांनी सुरु केली आहे. प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे की कोण आहे हिटलरची नवरी.

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचे लेखन सायली केदार हिने केलं आहे, तर चंद्रकांत गायकवाड मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या एरिकॉन टेलिफिल्म्सने केली आहे. याच निर्मितीसंस्थेची 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या झी मराठीवर गाजत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news