Gyanvapi Survey : ज्ञानवापी सर्व्हेच्या मीडिया कव्हरेजवर बंदी घाला; मुस्लिम पक्षाची मागणी

ज्ञानवापी मशिद ( संग्रहित छायाचित्र )
ज्ञानवापी मशिद ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाइन डेस्क : Gyanvapi Survey : ज्ञानवापी मशिदीचे (ASI) आज बुधवारी सलग सहाव्या दिवशी देखील सर्व्हे सुरू आहे. दरम्यान, या सर्व्हेच्या मीडिया कव्हरेजवर बंदी आणावी अशी मागणी मुस्लिम पक्षकारांकडून करण्यात आली आहे. यासंबंधीचा अर्ज मुस्लिम पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे दाखल केला आहे.

प्रयागराज उच्च न्यायालयाने 3 ऑगस्टला ASI ला मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध ज्ञानवापीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीची याचिका फेटाळून लावली. दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि सर्व्हे सुरू झाला.

गेल्या 5 दिवसांपासून ज्ञानवापी संकुलाचे शास्त्रोक्त सर्व्हे सुरू आहे. आज बुधवारी देखील सकाळी हे सर्व्हेक्षण पुढे सुरू ठेवण्यात आले आहे. दरम्यान या सर्व्हेविषयी दररोज माध्यमांमधून प्रत्येक दिवसाचे वृत्तांकन करण्यात येत आहे. हे मीडिया कव्हरेज बंद करावे अशी मागणी मुस्लीम पक्षाने जिल्हा न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे. याविषयी मुस्लिम पक्षाने म्हटले आहे की एएसआय सर्व्हेक्षण न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे आणि कोणत्याही अधिकाऱ्याने कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. परंतु सोशल मीडिया, टेलिव्हिजन आणि वर्तमानपत्रांवर सर्वेक्षणाचे सतत कव्हरेज केले जात आहे. Gyanvapi Survey

सर्वेक्षणाचे मीडिया कव्हरेज 'भ्रामक' असल्याचे सांगून मुस्लिम याचिकाकर्त्यांनी सांगितले की याचा लोकांच्या मतावर परिणाम होईल आणि ते थांबवले पाहिजे.

Gyanvapi Survey : तीन टीमद्वारे सर्वेक्षण

सर्वेक्षण टीमची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संकुलाच्या उत्तरेकडील भिंत, घुमट आणि तळघरांचे सर्वेक्षण केले आहे, असे सरकारी वकिलांनी पीटीआयला सांगितले आहे.

हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार परिसरामध्ये सविस्तर वैज्ञानिक अभ्यास केला जात आहे. दुसर्‍या वकिलाने सांगितले की एएसआय टीम पुरावे गोळा करत आहे आणि संकुलाच्या घुमट आणि पॅव्हेलियन व्यतिरिक्त, तळघरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news