पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातील टी २० विश्वचषकातील प्रवास सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवाने समाप्त झाला. भारताने विश्वचषकात चांगली सुरूवात केली होती. मात्र, सेमी फायनमध्ये भारताचा लाजिरवाना पराभव झाला. दरम्यान, सेमी फायनलमधील पराभवामुळे १५ वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरण्याचे टीम इंडियाचे स्वप्न अपूर्णच राहिले. परंतु, भारतीय खेळाडूंनी या विश्वचषकात चांगली कामगिरी केली. विराट कोहलीनेही आपला उत्कृष्ठ खेळ दाखवला. गेल्या अनेक महिन्यांपासून विराटची कामगिरी खराब राहिली होती. तो फॉर्मशी झुंज देत होता. मात्र, विराटने आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. दरम्यान, भारतीय संघ अंतिम फेरी गाठू शकला नसला तरी, विराट कोहली विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. (Greatest T20 Shot)
विराटच्या पाकिस्तानविरुद्धच्या खेळीचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले. विराटच्या या खेळीनंतर भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल म्हणाले होते की, विराट हा सध्याच्या घडीचा परिपूर्ण फलंदाज आहे. भारताला विश्वचषकातील पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणार होता. एकापोठोपाठ एक विकेट्स पडल्याने भारताच्या हातातून सामना निसटेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, विराटच्या फटकेबाजीने भारतीय संघाने या रोमहर्षक सामन्यात सनसनाटी विजय मिळवला. (Greatest T20 Shot)
विराटने रॉफ हॅरिसने टाकलेल्या १९ व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर २ षटकार लगावले आणि हातातून निसटलेला सामना खेचून आणला. यानंतरचे २० वे षटकही रोमहर्षक होते. ज्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. (Greatest T20 Shot)
हॅरिस रॉफच्या चांगली गोलंदाजी केली होती. त्याने कोहलीला षटकार लगावता येऊ नये, असा चेंडूही टाकला होता. मात्र, विराटने त्याच चेंडूवर षटकार लगावला. आयसीसीने विराटच्या या शॉटचे कौतुक केले आहे. विराट कोहलीने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, ते कोणत्याही खेळाडूला जमले नसते. विराटने खेळलेल्या त्या शॉटची त्याच क्षणी इतिहासात नोंद झाली होती. कोहलीने हॅरिस रॉफला ५ व्या चेंडूवर लगावलेला षटकार जबरदस्त होता. तो आत्तापर्यंतच्या टी २० क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ शॉट होता, असे 'आयसीसी'ने म्हटले आहे.