जम्मूमध्ये भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय लष्कराची डोडा येथे कामगिरी
Indian Army Killed Three Terrorist's In Doda
जम्मूमध्ये भारतीय लष्कराकडून दहशतवाद्याचा शोध घेतला जात आहे.Representative Image

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मु येथील डोडामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या जवानांनी बुधवारी ( दि.26) तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर डोंगराल भागात लपलेल्या चौथ्या दहशतवाद्याचा शोध सुरू जवानांकडून घेण्यात येत आहे.

बुधवारी डोडामध्ये असलेल्या जंगलात चकमक सुरू झाली होती. यामध्ये सुरक्षा दलांनी आतापर्यंत दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 11 आणि 12 जून रोजी पहाडी जिल्ह्यात झालेल्या दुहेरी दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासह पोलिसांनी सखोल शोध आणि घेराबंदीच्या मोहिमेदरम्यान गडोह भागातील बाजड गावातमध्ये सकाळी 10 च्या सुमारास गोळीबार सुरू झाला होता.

Indian Army Killed Three Terrorist's In Doda
भारतीय लष्कर अत्याधुनिक अन् सतर्क : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी तीव्र कारवाया केल्या आहेत. डोडा जिल्ह्यात चार पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करत होते. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांच्या मदतीने पोलिसांनी सिनू गावात ऑपरेशन केले, परंतु 'ढोक'मध्ये लपलेल्या दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. तो गोळीबार गोळीबार सुरूच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news