आडूळ (औरंगाबाद) ; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील घारेगाव येथे काल (शुक्रवार) रात्री झालेल्या जोरदार पावसाने घराचा माळा कोसळला. या दुर्घटनेत आजोबांसह नातीचा मृत्यू झाला. साठ वर्षीय आजोबांसह नातीचा दुर्देवी मृत्यू झाला. यावेळी माळ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून आजोबांसह नातीचा मृत्यू झाला. ही घटना रात्री १२;३० वाजण्याच्या सुमारास घडली. जगदिश विठ्ठल थोरे (वय ६०) वेदिका ज्ञानेश्वर थोरे (वय१३) असे मृत आजोबा व नातीचे नाव आहे. या दुर्घटनेत सून व नातू जखमी झाले आहेत.
या विषयी अधिक माहीती अशी की, पैठण तालुक्यात गेल्या दहा बारा दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
परंतु आडूळ परिसरातील घारेगाव येथे काल (शुक्रवार) रात्री तब्बल तीन-चार तास जोरदार पावसाने हजेरी लावली.
त्यामूळे परिसरात सर्वत्र पूर स्थिती निर्माण झाली होती.
नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
थोरे कुंटुंब रात्री आठच्या दरम्यान झोपी गेले. याच दरम्यान जोरदार पावसामुळे घरावरील माळा खचून घरातील पाच सदस्यांच्या अंगावर पडला. यामध्ये तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले.
मात्र जगदिश थोरे व वेदिका थोरे हे दोघेजण पडलेल्या माळदाच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. माळा अंगावर पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती रात्रीच्या वेळी आजुबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी तात्काळ एका जेसीबी चालकास संपर्क करून बोलावून घेतले.
माळ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या पाचही जणांना बाहेर काढून एका खाजगी वाहनाव्दारे तातडीने आडूळ येथील आरोग्य केद्रांत उपचारासाठी दाखल केले.
ग्रामस्थांनी या घटनेची माहिती रूग्णवाहीकेला कळविली असताना देखील रूग्णवाहिका वेळेवर आली नाही, असे जखमींच्या नातेवाईकांनी सांगितले.
रात्री या आरोग्य केद्रांत वेळेवर डॉक्टरांकडून त्यांना योग्य उपचार न भेटल्याने जगदीश थोरे व वेदिका थोरे यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांची तक्रार आहे.
दरम्यान डॉक्टरांनी उपचारा दरम्यान हे मृत झाल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेने आडूळ परिसरावर शोककळा पसरली आहे.
पाचोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, बिट जमादार जगन्नाथ उबाळे, हनुमान धन्वे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.