झव्हेरी बाजारातील सोने तस्करीचा पर्दाफाश; चौघांना अटक

झव्हेरी बाजारातील सोने तस्करीचा पर्दाफाश; चौघांना अटक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  झव्हेरी बाजारातील सोने तस्करीचा महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश करुन चार आरोपींना अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या टोळीकडून आफ्रिकेतून आणलेल्या सोन्यावर विदेशी खुणा काढून ते वितळवून त्याची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या संपूर्ण कारवाईत या अधिकार्‍यांनी 9 किलो 670 ग्रॅम वजनाचे सोने, 18 किलो 480 ग्रॅम वजनाची चांदी, 1 कोटी 92 लाखांचे भारतीय आणि 10 कोटी 48 लाख रुपयांचे विदेशी चलनाचा साठा जप्त केला आहे.

या कामासाठी कॅरिअरची मदत घेतली जात होती, त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन जात असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून विदेशातून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होत असून या तस्करीमागे काही आफ्रिकन नागरिक सक्रिय असल्याची माहिती मुंबई युनिटच्या डीआआयच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यामुळे या अधिकार्‍यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. चौकशीदरम्यान एका संशयिताला या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. तो आफ्रिकन नागरिकासाठी कॅरिअर म्हणजे वाहक म्हणून काम करत होता.

या आरोपींकडून सोने घेतल्यानंतर तो सोन्यावरील विदेशी खुणा काढून त्यावर प्रक्रिया करत होता. त्यानतर ते सोने त्यांच्या सांगण्यावरुन संबंधित व्यक्तीला दिले जात होते. त्यामुळे या अधिकार्‍यांनी कामगाराची भरती करणार्‍या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तेथून या अधिकार्‍यांनी 10 कोटी 48 लाख रुपयांचे विदेशी चन जप्त केले होते.

सोने खरेदीसाठी ही रक्कम तिथे पाठविण्यात आली होती. या कार्यालयातून मिळालेल्या माहितीवरुन या अधिकार्‍यांनी सोने खरेदी करणार्‍या व्यापार्‍याच्या कार्यालयात छापा टाकला होता. मात्र त्यापूर्वीच संबंधित व्यापारी तेथून पळून गेला होता. या कार्यालयातून या अधिकार्‍यांनी 351 ग्रॅम वजनाचे विदेशी सोन्याचे तुकडे, 1818 ग्रॅम वजनाचे चांदी आणि 1 कोटी 92 लाख रुपयांचे भारतीय चलन जप्त केले.

दरम्यान, या सोने तस्करीतील काहीजण झव्हेरी बाजारातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी चारजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यात कॅरिअरसह सोने वितवळणार्‍यां व्यक्तींचा समावेश होता. या कामासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन दिले जात होते.

विदेशातून सोने तस्करी करणार्‍या टोळीसाठी ही टोळी काम करत होती. त्यांचा या गुन्ह्यात सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सीमा शुल्क कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. गुन्हा दाखल होताच या सर्व आरोपींना या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर चारही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news