Goa congress : गोवा विधानसभा निवडणूक गिरीश चोडणकर यांच्याच नेतृत्वात

Goa congress : गोवा विधानसभा निवडणूक गिरीश चोडणकर यांच्याच नेतृत्वात
Published on
Updated on

पणजी, विलास ओहाळ : आगामी विधानसभा निवडणूक गोवा काँग्रेस (Goa congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याच नेतृत्वाखाली लढवणार हे निश्चित झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने पक्षांतर्गत बंडाळीवर तोडगा काढला असून, शात स्वभावाचे माजी आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे कार्याध्यक्षपदाचा भार सोपविला आहे.

पी. चिदंबरम यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पक्षात त्वरीत पावले उचलली जाऊ लागली आहेत. तीन  दिवसांपूर्वी जिल्हा व गट समिती बरखास्त करण्याचे आदेश प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिले होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रदेश समितीला या निवडीचे पत्र पाठविले आहे.

केंद्रीय समितीने दिगंबर कामत यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद कायम ठेवले आहे. त्याशिवाय प्रदेशाध्यक्षांना विरोध करणाऱ्यांतील आमदार लुईझीन फालेरो यांच्याकडे निवडणूक समन्वय समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

पक्षाने (Goa congress) निवडलेल्या समिती पुढीलप्रमाणे : निवडणूक समन्वय समिती : लुईझीन फालेरो (अध्यक्ष), एम. के. शेख (निमंत्रक) . प्रचार समिती : आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (अध्यक्ष), संगीता परब (सह अध्यक्ष), वित्तपुरवठा समिती : फ्रान्सिस सार्दिन (अध्यक्ष), डॉ. प्रमोदा साळगावकर (सह अध्यक्ष), जाहीरनामा समिती : ॲड. रमाकांत खलप (अध्यक्ष), एल्विस गोम्स ( सह अध्यक्ष), प्रसिद्धी समिती : चंद्रकांत चोडणकर ( अध्यक्ष), मार्था साल्ढाना (सह अध्यक्ष).

प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांना विरोध करणाऱ्यांतील फालेरो, रेजिनाल्ड आणि सार्दिन या तिघांकडे समित्यांचे अध्यक्षपद केंद्रीय समितीने सोपविले आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे शांत स्वभावाचे माजी आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे कार्याध्यक्षपद दिले आहे आणि रेजिनाल्ड यांच्याकडे प्रचाराची सूत्रे दिली आहेत.आपला मतदारसंघ सोडून कोणाचाही प्रचार करणार नाही असे सांगणाऱ्या रेजिनाल्ड यांना आता इतराच्या प्रचारासाठी फिरावे लागणार आहे. खासदार सार्दिन यांच्याकडे आर्थिक व्यवहार सोपविले आहेत.

पहा व्हिडीओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news