गाैतमी पाटील ठाणेकरांच्‍या प्रतिसादाने भारावली, म्‍हणाली…

Gautami Patil Live
Gautami Patil Live
पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाण्‍यातील टेंभी नाका येथील दहिहंडीनिमित्त आयाोजित कार्यक्रमात आज (दि.७) लावणी नृत्‍यांगणा गाैतमी पाटील हिने हजेरी लावली. यावेळी तिच्‍या नृत्‍यावर तरुणाई थिरकली. गौतमीच्या वडिलांचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले हाेते. अशा परिस्थितीतही न खचता तिचे नृत्याचे कार्यक्रम सादर करत चाहत्‍यांची मने जिंकली. 
मुंबईतील लोकांचे प्रेम पाहिले खूप छान वाटले…

मागाठाणे येथे तारामती चॅरीटेबल फाऊंडेशनचा दहिहंडी उत्सवानिमित्त आयाोजित कार्यक्रमात गाैतमीने नृत्य सादर केले. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून कार्यक्रमाचे  आयोजन करण्‍यात आले हाेते. यावेळी चाहत्यांकडून गौतमीच्‍या नृत्‍याला तुफान प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमानंतर बाेलताना गाैतमी म्‍हणाली की, आज येथे लोकांचे प्रेम बघून फार छान वाटतय. महाराष्‍ट्रातील विविध ठिकाणी माझ्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, आज मुंबईतील लोकांचे प्रेम पाहिले खूप छान वाटले, 

चार दिवसांपूर्वी वडिलांचे निधन

गाैतमीचे वडील काही दिवसांपूर्वी धुळ येथे बेवारस अवस्‍थेत सापडले हाेते. पुण्यातील बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. चार दिवसांपूर्वी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला हाेता. गाैतमीचे आई आणि वडील काही वर्षांपासून विभक्‍त राहत होते. गौतमी तिच्या आईसोबत राहत होती.  

 हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news