नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर आणि नेता मुख्तार अन्सारी याचा मुलगा अब्बास अन्सारी याच्यावर पुढील आदेशापर्यंत कोणतीही कारवाई करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी दिले. शस्त्रबंदी कायद्यासह इतर अनेक गुन्हे अन्सारीवर दाखल आहेत.
मऊ विधानसभा मतदारसंघाचा आमदार असलेल्या अब्बास अन्सारीची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एमपी-एमएलए न्यायालयाने दिले होते. निवडणूक प्रचारावेळी प्रक्षोभक भाषणे दिल्याचा आरोप असलेल्या अब्बास तसेच त्याचा भाऊ उमर यांच्याविरोधात एमपी-एमएलए न्यायालयाने अजामीनापात्र अटक वॉरंट जारी केले होते.
अब्बासने 2012 साली लखनौमध्ये जारी केलेला शस्त्र परवाना त्याच्या दिल्लीतील घराच्या नावावर हस्तांतरित केला होता. नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. वारंवार सुनावणीस गैरहजर राहत असल्याबद्दल त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एमपी-एमएलए न्यायालयातील या प्रकरणातील सुनावणी 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हेही वाचलंत का ?