Lawrence Bishnoi : गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईला सात दिवसांची एनआयए कोठडी

Lawrence Bishnoi : गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईला सात दिवसांची एनआयए कोठडी
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याला दिल्लीत आणले गेले असून विशेष न्यायालयाने त्याची सात दिवसांसाठी एनआयए कोठडीत रवानगी केली आहे. खलिस्तानी संघटनेला टेरर फंडिंग केल्याच्या प्रकरणात बिष्णोईला ही कोठडी मिळाली आहे.

लाॅरेन्सविरोधात असलेले पुरावे पुढील आठवड्यात सादर करावेत, असे निर्देश न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला दिले आहेत. टेरर फंडिंगप्रकरणी लाॅरेन्सविरोधात गतवर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले जाणार होते, तथापि या न्यायालयाने हे प्रकरण विशेष न्यायालयाकडे वर्ग केले होते. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर लाॅरेन्सला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पंजाबहून दिल्लीत आणले गेले आहे. लाॅरेन्स हा मागील काही काळापासून भटिंडा येथील तुरुंगात  बंद आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news