Gangster Goldie Brar | गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित, सिद्धू मूसेवाला हत्‍याकांडात होता मुख्य आरोपी

Gangster Goldie Brar | गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित, सिद्धू मूसेवाला हत्‍याकांडात होता मुख्य आरोपी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गँगस्टर गोल्डी ब्रार याला आज (दि. १) केंद्र सरकारने बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, गोल्डी ब्रार प्रतिबंधित खलिस्तानी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, गोल्डी ब्रारला सीमापार दहशतवादी एजन्सींचा पाठिंबा आहे आणि त्याचा अनेक हत्यांमध्ये समावेश आहे. नेत्यांना धमकीचे कॉल करणे, खंडणीची मागणी करणे आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हत्येचे दावे पोस्ट करणे अशा गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश आहे.

गोल्डी ब्रार हा काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी

गोल्डी ब्रार हा २९ मे २०२२ रोजी रॅपर आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. गोल्डी ब्रारने अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून भारतातून पळ काढला होता. त्यानंतर त्याने कॅनडा आणि अमेरिकेत आश्रय घेतला. पण त्याचे साथीदार देशातच राहिले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गोल्डी ब्रार विरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल केला होता. पंजाबमध्येही त्याच्याविरुद्धचे अनेक खटलेही प्रलंबित आहेत.

देशातील दहशतवादी आणि गँगस्टर्सचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी गेल्या वर्षी नोंदवलेल्या दोन प्रकरणांच्या तपासात कोण वॉन्टेड आहेत, अशा ५४ व्यक्तींच्या छायाचित्रांसह एनआयने लिस्ट जारी केल्या होत्या. त्यात गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई आणि अर्शदीप सिंग गिल यांच्यासह अनेक वॉन्टेड गँगस्टर्सचा समावेश आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news