पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन विरोधात युद्ध पुकारणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आता जी ७ सदस्य देशांना धमकी दिली आहे. जी ७ सदस्य देशानी रशियाच्या तेलावर नवी किंमत मर्यादा योजना (G7-Russian oil price) जाहीर केल्यामुळे ही धमकी त्यांनी दिली. पुतिन यांनी दिेलेल्या माहितीनूसार या योजनेमध्ये जे कोणते देश सामील होतील त्यांना रशियाकडून तेल आणि गॅसचा पुरवठा बंद केला जाईल.
पुतिन यांनी प्रशांत महासागरावरील शहर व्लादिवोस्तोक येथे माध्यमाला दिलेल्या माहितीनूसार पश्चिमेकडील काही देश तेलाच्या किमतींवर मर्यादा आणण्याचा विचार विचार करत आहेत. पण हा पूर्णता चूकीचा निर्णय आहे. जर हे आमच्या हितांच्या दृष्टिने असेल, तर आम्ही आमच्या आर्थिक फायद्याचा विचार करून कोणत्याही वस्तूचा पुरवठा आम्ही करणार नाही. ना गॅस, ना तेल, ना कोळसा, ना कोणते इंधन कोणताही पुरवठा केला जाणार नाही असे पुतिन यांनी ठणकाऊन सांगितले आहे. (G7-Russian oil price)
रशियन तेलावर किंमत मर्यादा लागू करणे निर्धार घेतल्यानंतर, या प्रणालीशी सहमत असणाऱ्या देशांना केवळ समुद्रामार्गे वाहतूक केलेले रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्याची परवानगी दिली जाईल.
युक्रेनमधील युद्धाला वित्तपुरवठा करण्याच्या मॉस्कोच्या क्षमतेला धक्का पोहोचविण्यासाठी G7 च्या सदस्यांनी रशियन तेलावर किंमत मर्यादा लादण्याचा निर्णय घेतला. कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीवर मर्यादा आणल्याने जागतिक ऊर्जेच्या किमती कमी करणे सोईस्कर होईल. रशियाच्या तेलावर किंमत मर्यादा आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या कमजोर करणे सोपे होईल. जी ७ ने हा किंमत मर्यादेचा निर्णय देत म्हणाले की, "आम्ही युक्रेनच्या पाठीशी उभे राहू."
यामुळेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जी ७ देशांच्या या नव्या निर्णयास नकार दिली. तसेच तेल आणि गॅस पुरवठा खंडित करू अशी धमकी देखील दिली.
अमेरिकेने विकसित राष्ट्रांच्या G-7 च्या घोषणेनुसार रशियन तेल आयातीवर किंमत मर्यादा लागू करण्याचा निर्धार केला आहे. रशियन तेलाच्या किमती नियंत्रित करण्याचा हा "प्रभावी मार्ग" युक्रेनमधील रशियाच्या "बेकायदेशीर युद्धासाठी निधीच्या मुख्य स्त्रोतावर परिणाम करेल, असे अमेरिकेने सांगितले आहे.
हेही वाचा