Mahindra Group : महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशुब महिंद्रा यांचे निधन; वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

mahindra group
mahindra group

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mahindra Group : महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे काका केशुब महिंद्रा यांचे 12 एप्रिल रोजी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. बिझनेस टुडे ने गोयंका यांच्या ट्वीटच्या हवाले याचे वृत्त दिले आहे. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (INSPACE) चे अध्यक्ष पवन गोयंका यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला.

गोयंका यांनी ट्विट केले, "औद्योगिक जगाने आज सर्वात उच्च व्यक्तिमत्त्वांपैकी एक गमावले आहे. श्री केशुब महिंद्रा यांच्याशी कोणाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. मला त्यांना जाणून घेण्याचा बहुमान मिळाला आहे. मी नेहमीच त्यांच्या भेटीसाठी उत्सुक होतो आणि त्यांनी व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सामाजिक बाबी यांना कसे जोडले यावरून प्रेरणा मिळाली. ओम शांती."

Mahindra Group : केशुब महिंद्रा यांच्या विषयी…

केशुब महिंद्रा यांनी व्हार्टनमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, 1947 मध्ये महिंद्रा समूहात सामील झाले. ते 1963 मध्ये महिंद्रा समूहाचे अध्यक्ष बनले. महिंद्रा समूहाचा मुख्य व्यवसाय त्यावेळी ऐतिहासिक विलीस जीप बनवणे हा होता.

कंपनी कायदा आणि मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती (MRTP) विधान आणि केंद्रीय उद्योग सल्लागार समिती यासह विविध सरकारी समित्यांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

1987 मध्ये त्यांना फ्रेंच सरकारने शेव्हॅलियर डे ल'ऑर्डे नॅशनल डे ला लीजन डी'होन्युरने सन्मानित केले. ते 2004 ते 2010 पर्यंत पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य होते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news