पुढारी ऑनलाइन डेस्क : Floting Bridge : ओडिसाच्या चिलीका तलावात 'फ्लोटिंग ब्रिज'100 जणांसह अडकले. महत्वाचे म्हणजे तलावात अशा प्रकारे 'फ्लोटिंग ब्रिज' अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे हा गंभीर चिंतेचा विषय बनत आहे. आज रविवारी सात पाडाहून जान्हीकुडाकडे जाताना तरंगत्या पुलाच्या जहाजात तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे 100 लोक, दोन बस आणि इतर वाहने अडकून पडली आहेत.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, Floting Bridge : 'फ्लोटिंग ब्रिज'मध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप तरी कोणत्याही जीवित हानीचे वृत्त नाही. यापूर्वी 14 जानेवारीला 20 भाविकांसह मां कालीजाई मंदिराकडे जाणारी एक प्रवासी बोट दाट धुक्यामुळे चिलीका तलावात मध्यभागी अडकली होती. यामुळे धुके कमी होईपर्यंत स्थानिक प्रशासनाने चिलीका तलावातील बोट सेवा तात्पुरती स्थगित केली.
Floting Bridge : शिवाय, चिलीका तलावाच्या मध्यभागी प्रवाशांसह 'फ्लोटिंग ब्रिज' अडकून पडण्याची वेळ आली नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे ६० प्रवासी चिलीका तलावाच्या मध्यभागी वाहून गेले होते.
हे ही वाचा :