धुळे : मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून मच्छीमाराचा मृत्यू

धुळे : मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून मच्छीमाराचा मृत्यू

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मासेमारीसाठी तलावात पसरवलेल्या जाळ्यात अडकल्याने मच्छीमारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील काळगाव येथील धरणात हा प्रकार घडला आहे.

म्हसदी येथे राहणारे दिलीप आनंद सोनवणे यांनी काळगाव येथील धरणात मासे मारण्यासाठी जाळे पसरवले होते. यानंतर ते जाळ्यामध्ये अडकलेले मासे काढण्यासाठी एकटेच तलावात उतरले. पण त्यांचा पाय जाळ्यात अडकल्याने ते खोल पाण्यात बुडाल्याची बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली.

मात्र मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना धुळे येथील साक्री येथील रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून ते मृत झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. यासंदर्भात साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news