सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद; शेतकरी आक्रमक

सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद; शेतकरी आक्रमक

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली आहे. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी शुक्रवारी (दि. ८) कांदा लिलाव बंद ठेवल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी लिलाव सुरु करावा, यासाठी आंदोलन सुरु केले आहे.

संबंधित बातम्या

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी कांदा लिलाव केले नाहीत. मात्र, निर्यातबंदीमुळे व्यापार्‍यांनी लिलाव बंद ठेवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आक्रमक होऊन सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर आंदोलन सुरु केले.

गुरुवारी (दि. ७) रोजी बाजार समितीमध्ये आठशेपेक्षा जास्त ट्रक कांद्याची आवक झाली होती. गुरुवारी आलेल्या कांद्याचा शुक्रवारी लिलाव झाला नाही. त्यातच शुक्रवारी ही मोठ्या प्रमाणात कांदा आवक होणार आहे. त्यामुळे भाव पडण्याची शक्यता असल्याने लिलाव आजच करावा, अशा मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.

आंदोलनात पोलीसांची मध्यस्थी

कांदा लिलाव सुरु व्हावा, यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकर्‍यांनी सोलापूर-हैद्राबाद महामार्ग अडविला होता. त्यामुळे पोलीस यंत्रणा तेथे सक्रिय झाली. कांदा लिलाव आजच सुरु करण्यासाठी बाजार समितीच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन लिलाव सुरु करण्याचे आश्‍वासन पोलीसांनी दिले. यानंतर शेतकर्‍यांनी अध्याप बाजार समितीसमोर आंदोलन सुरु ठेवले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news