Mayilsamy : प्रसिद्ध कॉमेडियन मायलसामी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Mayilsamy : प्रसिद्ध कॉमेडियन मायलसामी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते मायलसामी ( Mayilsamy ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ५७ वर्षी जगाचा निरोप घेतला. मायलसामी यांची चेन्नई येथील त्यांच्या राहत्या घरी तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती अभिनेता रमेश बाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन मायलसामी ( Mayilsamy ) यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. तर अभिनेता रमेश खन्ना, मनो बाला याच्यासह अनेक चाहत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मायलसामी यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, त्यांनी तमिळ अभिनेता विवेक आणि वडिवेलूसह अनेक विनोदी कलाकारांसोबत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'कंचना (२०११), वेदालम (२०१५), गिल्ली (२००४), वीरम (२०१४ ), कंचना-२ ( २०१५) आणि कसु मेला कसु (२०१८) यासह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर मायलसामी यांनी २०२१ ची विधानसभा निवडणूक विरुगंबक्कम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. मायलसामी यांनी चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही शो देखील केले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news