Matheran-Neral Toy Train : माथेरानच्या टॉय ट्रेनला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; वर्षभरात ३.५४ कोटींची कमाई

Matheran-Neral Toy Train
Matheran-Neral Toy Train
Published on
Updated on

रोहे (रायगड), पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई, पुणे, ठाणेसह नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. ११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेचा समावेश आहे.

सध्या मध्य रेल्वे नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान दररोज ४ सेवा आणि अमन लॉज-माथेरान-अमन लॉज दरम्यान १६ सेवा चालवते, त्यापैकी १२ सेवा दररोज चालतात आणि ४ विशेष सेवा फक्त आठवड्याच्या शेवटी (शनिवार आणि रविवार) चालतात.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात माथेरानमध्ये एकूण ५ लाख प्रवासी वाहतूक करण्यात आली असून त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान ३.७५ लाख प्रवासी आणि नेरळ ते माथेरान दरम्यानच्या १.२५ लाख प्रवाशांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अमन लॉज आणि माथेरान दरम्यान रु. २.४८ कोटी आणि नेरळ आणि माथेरान दरम्यान रु. १.०६ कोटींचे यासह एकूण उत्पन्न रु. ३.५४ कोटींचे आहे.

मध्य रेल्वेने माथेरान येथे स्लीपिंग पॉड्स, ज्याला पॉड हॉटेल म्हणूनही ओळखले जाते. बांधण्याची तयारी केली असून ज्यामध्ये सिंगल पॉड्स, डबल पॉड्स आणि फॅमिली पॉड्स असणार आहेत. यामुळे पर्यटकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी निवासाचे विविध पर्याय उपलब्ध असणार आहेत. या वातानुकूलित पॉड्स मध्ये मोबाईल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सेवा, फायर अलार्म, इंटरकॉम सिस्टम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम सुविधांसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून जास्तीत जास्त आरामदायी आणि गोपनीयता प्रदान करणारे आहेत.

पॉड हॉटेलच्या विकासाचे आणि कामकाजाचे कंत्राट ई-लिलावाद्वारे देण्यात आले आहे. पॉड हॉटेलसाठी बुकिंगचे पर्याय सुलभ असणार आहेत. पर्यटक रिसेप्शनवर आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून मोबाइल ॲपद्वारे पॉड आरक्षित करू शकणार आहेत.
हा उपक्रम केवळ पर्यटकांसाठी अनुभवच वाढवणारच नाही. तर पर्यटनाला चालना देऊन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्थानिक अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान देतील.

ही आकडेवारी या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते. मध्य रेल्वे या ठिकाणाला केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करत नाही तर निसर्गाला जवळून पाहण्याचा आनंद देणारे ठिकाण म्हणून टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईड ही माथेरानच्या अल्हाददायक वातावरणाच्या शांततेत रमवून टाकणारी आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news