Eknath Shinde : तयारी सत्ता स्थापनेची; एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गोव्यात दाखल

Eknath Shinde : तयारी सत्ता स्थापनेची; एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गोव्यात दाखल
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी अपक्षांसह ३९ आमदार बुधवारी (दि.29) रात्री दहा वाजताच्या सुमारास गोव्यातील दाबोळी विमानतळावर दाखल झाले. शिवसेनेवर नाराज होऊन बंडखोर आमदार गुवाहाटी येथे गेले अनेक दिवस राहिले होते. एकनाथ शिंदे व इतर आमदारांच्या सुरक्षेसाठी विमानतळावरील सुरक्षा कडक ठेवण्यात आली होती. सुरुवातीला विमानातून आलेले इतर प्रवासी आपल्या सामानासह विमानतळाच्या बाहेर पडले. त्यानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार कडक सुरक्षा व्यवस्थेत दोनापावला येथील हॉटेलकडे रवाना झाले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले की, हा आमच्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा क्षण नाही. आमची मागणी होती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार करावे आणि पुढेही आमची मागणी तीच राहणार आहे. आमच्याकडे बहुमत आहे. भाजपच्या सहाय्याने आम्ही सरकार स्थापन करू. पुढील अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव असे काम करु, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news