पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील प्रसिद्ध खाण उद्योजक राधा तिंबले यांचे पुत्र रोहन तिंबलो याच्या किनारी भागातील ३६.८० कोटीच्या स्थावर मालमत्ता सक्त वसुली संचालनालय ( ईडी ) जप्त केल्या. आज दि. १९ रोजी ही कारवाई करण्यात आली.
रोहण तिंबलो याने आपल्या सिंगापुरी स्थित ट्रस्टची आणि त्यापासून होणाऱ्या कमाईची माहिती भारत सरकारला दिली नाही. त्यामुळे फेमा कायद्याचा भंग झाला. यातून त्यांनी मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला. त्यामुळे ईडीने कारवाई करत रोहन तिंबलो याची ३६.८० कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. गोव्यातील किनारी भागातील ही मालमत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही मालमत्ता स्थावर मालमत्ता रूपात आहे. पेंडोरा पेपर लीक प्रकरणी तपासाचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे कळते. रोहित तिंबलो यांच्या सिंगापूर येथील एशीयासीटो ट्रस्टच्या तीन कंपन्या आहेत. त्या आता इंनलेंड रेवेन्यू अथोरिटी ऑफ सिंगापूरच्या स्कॅनरखाली आल्या आहेत. रोहित तिंबलो याने आपल्या ट्रस्टची भांडवली गुंतवणूक ३७.३४ कोटी असतानाही सरकारला त्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. कर भरला नाही त्यामुळे फेमा कायद्याचा भंग झाला असल्याच्या कारणामुळे त्याच्यावर ईडीने कारवाई केल्याचे कळते.