संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल!

Maharashtra Politics
Maharashtra Politics

[visual_portfolio id="277441"]

पुढारी ऑनलाइन डेस्क : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती आहे. दरम्यान, यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ही चौकशी किती काळ चालेल हे सांगता येणार नाही. राऊत यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यात ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. ईडीसोबत केंद्रीय सुरक्षा रक्षक दलांचे सुरक्षा रक्षक आहेत.

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना ईडी ने वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. तरीही त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याने ईडीचे अधिकारी आज चौकशीसाठी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पत्राचाळ प्रकरणी हजारो कोटींची हेराफेरी झाली असून हा पैसा थेट संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात वळवण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news