Supermoon: आज सुपरमून पाहायला विसरू नका!

chance to watch supermoon
chance to watch supermoon

पुढारी ऑनलाइन डेस्क: आज (दि.13) गुरू पौर्णिमा असून आजच्या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आज सुपरमून पाहायला मिळणार आहे. सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे. विशेष म्हणजे जून महिन्यानंतर लगेच जुलै महिन्यात सुपरमून पाहायला मिळणार आहे.

जून महिन्यात 14 तारखेच्या पौर्णिमेला सुपरमून पाहायला मिळाले होते मात्र तेव्हाही ढगाळ वातावरणामुळे अनेकांना ते पाहायला मिळाले नाही. मात्र सुपरमून पाहायला उत्सूक असणा-यांना या महिन्यात पुन्हा एकदा ही संधी मिळणार आहे. त्यामुळे आज रात्री सुपरमून पाहण्याची संधी सोडू नका.

काय आहे सुपरमून?

चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो. त्याची कक्षा ठरलेली असते. मात्र वर्षाच्या ठाराविक पौर्णिमेच्या वेळी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असतो. त्यामुळे तो नेहमीपेक्षा खूप मोठा आणि अधिक शितल भासतो. त्यामुळे या चंद्राला सुपरमून असे म्हणतात. तसेच याच्या तीन ते चार दिवस आधीपासून चंद्र हा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे संपूर्ण भासतो. हे चंद्रबिंब पाहण्याचा आनंद अलौकिक असतो. त्यामुळे सुपरमून पाहण्याची आजची संधी दवडू नका.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news