पुढारी ऑनलाईन ; अभिनेता आणि DMDK पक्षाचे प्रमुख विजयकांत (Vijayakanth) यांचे निधन झाले. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
मंगळवारी DMDK कडून विजयकांत यांना नियमित तपासणीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले होते. पक्षाकडून विजयकांत यांची प्रकृती ठिक आहे, तपासणीनंतर ते रूग्णालयातून घरी परततील असे सांगण्यात आले होते.
दरम्यान आज पक्षाकडून विजयकांत यांच्या विषयी माहिती देताना त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, त्यांना वेटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले होते. मात्र यानंतर त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले.
विजयकांत यांचा जन्म मदुराईमध्ये अलर्गरस्वामी आणि आंदल यांच्या घरी झाला होता. विजयकांत तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते. त्याच्या साध्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. त्यांना चाहत्यांनी 'करुप्पू एमजीआर' आणि 'पुराची कलैग्नार' ही हे नाव दिले होते. त्याचा १०० वा हिट चित्रपट 'कॅप्टन प्रभाकरन'नंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा प्रेमाने 'कॅप्टन' म्हणून उल्लेख केला होता.
154 चित्रपटांमध्ये केले काम
डीएमडीके प्रमुख यांना 20 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या महिन्यात ते रुग्णालयातून घरी परतले होते. विजयकांत यांच्यावर श्वास संबंधी त्रासावरून उपचार सुरू होते. विजयकांत यांचा चित्रपट प्रवास यशस्वी होता. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्यांनी तब्बल 154 चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटातील यशस्वी कारकिर्दीनंतर ते राजकारणात आले. त्यांनी डीएमडीके पक्षाची स्थापना केली. विरुधाचलम आणि ऋषिवंदियम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी दोन वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. (Vijayakanth)