पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी म्हटलं की, कपड्याच्या खरेदीसोबत नवनविन फराळाच्या मेजवाणीची मज्जा औरच असते. एकिकडे महिला वर्गाला मात्र, दिवाळीत फराळ बनवण्यासाठी एक प्रकारचा कस लागतो. तर दुसरीकडे सणासुदीचे दिवस असल्याने महिलांना नटण्या- सजण्याचे वेड असते. अशावेळी जास्त करून महिला पार्लरचा वापर करतात. परंतु, घरातील कामातून काही महिलांना बाहेर पडता येत नाही. त्यांनी ही हौस घरच्या- घरीच आता पूर्ण करता येते. महिलांच्या सौंदर्यांत भर घालण्यासाठी मेकअपची गरज असते. परंतु, काही वेळा मेकअपनंतर काळजी घेतली नाही तर आपल्या त्वचेवर त्याच्या वाईट परिणाम होतो. यासाठी यंदाच्या दिवाळीत मेकअप कशा करावा याविषयी माहिती जाणून घेवूयात… ( Diwali Special Makeup )
संबंधित बातम्या
मेकअपकडे एक कला म्हणून पाहिले जाते. काही महिला ऑफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत करतात. काहीवेळा ही व्यवसायाची अथवा कामाची गरज असते. प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये जाऊन मेकअप करवून घेणे शक्य नसते. त्यामुळे मेकअपची काही सोपी तंत्रे जाणून घेतल्यास सोयीचे जाते. तसेच यंदाच्या दिवाळीतही हा मेकअप उपयोगी ठरतो. ( Diwali Special Makeup )
फौंडेशनचा विचार करता यात तीन प्रकार आढळतात. लिक्विड, क्रीम आणि पावडर. फौंडेशन वापरासाठी मऊ स्पंजचा वापर करावा. चेहर्यावर फौंडेशन लावून घेऊन हलक्या हाताने स्पंज फिरवावा. चेहर्याप्रमाणेच मानेवरही फौंडेशन लावावे. फौंडेशनला मेकअपचा बेस मानले जाते. त्याने चेहर्यावरील छोटे डाग, खड्डे, काळी वर्तुळे झाकली जातात. त्यामुळे फौंडेशन एकसारखे पसरणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्याचे लेअर्स स्पष्ट दिसून येतात.
त्वचेचा पोत लक्षात घेऊन फौंडेशनचा प्रकार निवडावा. मेकअप करताना डोळ्याकडे सर्वात जास्त लक्ष द्यावे. प्रथमदर्शनी डोळ्यांकडेच लक्ष जाते. त्यामुळे येथील छोटीशी चूकही सगळा मेकअप बिघडवून टाकते. डोळ्याच्या मेकअपसाठी शक्यतो वॉटरप्रूफ लाँग लास्टिंग मेकअप साहित्य वापरावे. मेकअपची सुरुवात आय शॅडो लावून करावी. त्यानंतर आय लायनर लावावा. पापण्यांवर हलक्या प्रमाणात ब्राँझ शेड वापरल्यास डोळे अधिक उठावदार दिसतात. त्यानंतर मस्करा वापरा.
प्रथम वरच्या आणि नंतर खालच्या पापणीला मस्करा लावावा. गालावर मेकअपचा हात फिरवताना तोच रंग जबड्यापाशी आणि गालाच्या कडांवर लावावा. यासाठी वार्म ब्रश वापरणे चांगले. डार्क ब्रशने त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो. नेहमी ब्राईट आणि ग्लॉसी कलर वापरावेत. यामुळे मेकओव्हरचा आनंद मिळवता येतो. मेकअप करण्याएवढेच लक्ष मेकअप उतरवण्याकडे द्यावे. न कंटाळता मेकअप धुणे आणि त्वचेवर ओलावा देणारी क्रीम लावणे महत्त्वाचे आहे. मेकअप अधिक काळ त्वचेवर राहिल्यास त्याचे काही साईड इफेक्टस् भोगावे लागतात हे लक्षात ठेवावे.