Disha Patani : ‘ऊ अंटावा’ वर दिशा पाटानीचा जबरदस्त डान्स

disha patani
disha patani

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटानी ( Disha Patani ) हिचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यात दिशा पुष्पाच्या 'ऊ अंटावा' या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

दिशा काळ्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हा व्हिडीओ पुरुष हॉकी विश्वचषक २०२३ उद्घाटनाचा आहे. दिशाच्या या व्हिडीओ वर सोशल मीडियावर जोरदार कमेंट होत आहेत. तू. जगातील सर्वात सुंदर मुलगी आहेस', असे एका युजरने म्हटले आहे. हा डान्स समथापेक्षा चांगला नाही असे दुसऱ्या एका युजरने म्हटले.

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' चित्रपटातील प्रत्येक डायलॉग आणि सीन प्रसिद्ध असला तरी, समंथा रुथच्या 'ऊ अंटावा' या गाण्याचा वेगळा चाहता वर्ग आहे. मात्र चित्रपटातील 'ऊ अंटावा' या गाण्यासाठी पहिली पसंती दिशा पाटनी होती, मात्र तिने नकार दिल्यानंतर हे गाणे समंथाला मिळाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news