पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझाने ( Diljit Dosanjh ) पंजाबी ते हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गायिली आहेत. यामुळे दिलजीतची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. दिलजीत पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याचे नाव अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टसोबत जोडले गेले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर स्वत: दिलजीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलजीत दोसांझ ( Diljit Dosanjh ) आणि अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट दोघेजण हार्बर येथील कॅफेमध्ये स्पॉट झाले होते. यावेळी दोघेजण हसत-हसत एकमेकांशी गप्पा गोष्टी करताना दिसले. यावरून चाहत्यांनी दोघांच्या डेटिंगची चर्चा रंगू लागली. दरम्यान दिलजीत दोसांझा टेलर स्विफ्टला डेट करत असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले.
या वृत्तानंतर दिलजीतने ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने लिहिले आहे की, 'यार प्रायव्हसी नावाची चिज आहे की नाही.' यावरून दिलजीत ट्रेलरला डेट करत असल्याचे बालले जात आहे. परंतु, याबाबतची दोघांच्याकडून अधिकृत्त माहिती अद्याप मिळालेली नाही. दिलजीत गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. दरम्यान त्याचा एक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दिलजीत 'अमर सिंह चमकीला' चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हा चित्रपटाचा गेल्या ३० मे रोजी धमाकेदार टीझर रिलीज जाल्यानंतर चाहत्यांना चित्रपटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिलजीतसोबत या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
हेही वाचा :