गोव्यातील विधानसभा निवडणुकीत डिजिटल ताकद ठरणार प्रभावी

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत डिजिटल ताकद ठरणार प्रभावी
Published on
Updated on

पणजी; पिनाक कल्लोळी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी, 8 रोजी पाच राज्यांतील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत भव्य राजकीय सभा घेण्यापेक्षा समाज माध्यमांवर भर देण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. गेल्या काही निवडणुकीत डिजिटल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयोगाच्या आदेशामुळे यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांची डिजिटल ताकदीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे भय वाढल्याने 15 जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा आणि जाहीर सभांवर बंदी घातली आहे. घरोघरी प्रचारासाठी केवळ पाच लोकांना परवानगी दिली आहे. 15 नंतरही कोव्हिड परिस्थिती कायम राहिली तर संपूर्ण निवडणुकीत हा आदेश कायम ठेवला जाऊ शकतो. तोपर्यंत राजकीय पक्षांना प्रचारासाठी समाज माध्यमांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

समाज माध्यमांचा विचार करता सध्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूब , व्हॉटस्अ‍ॅप यासारखे आभासी प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहेत. याशिवाय कु ,सिग्नल सारखे अ‍ॅपही आहेत. मात्र ते तेवढे लोकप्रिय नाहीत. प्रत्येक माध्यमांवर राजकीय पक्षांचे अकाऊंट आहेत. शिवाय नेत्यांचे स्वतःचे खासगी अकाऊंटही वेगळे आहेत. तसेच पक्षाच्या विविध शाखांचे, विभागांचे वेगवेगळे अकाउंट आहेत.

केवळ समाज माध्यमात अकाऊंट काढून भागत नाही. अकाऊंटला किती फॉलोअर्सवर आहेत, एखाद्या पोस्टला किती लाईक्स आणि कमेंट मिळतात, किती लोक ते शेअर करतात , पोस्ट किती लोकांपर्यंत पोहोचली, किती लोकांनी ती पूर्ण वाचली/ पहिली यावरच समाज माध्यमांचे यश अवलंबून असते. प्रत्येक राजकीय पक्ष आपला टार्गेट ऑडियन्स कोण आहे ? तसेच विविध समाज माध्यमांचे गुण अवगुण लक्षात घेऊनच समाज माध्यमांतील आशय तयार करतात.

फेसबुक, यूट्युबसारखे माध्यम सर्व स्तरातील लोक वापरतात. इन्स्टाग्राम अ‍ॅप विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. गोपनीयता प्रिय असणार्‍या व्यक्ती टेलीग्रामला प्राधान्य देतात, तर उच्चशिक्षित लोक बहुतेक करून ट्विटरचा वापर करतात. राजकीय पक्ष याचा विचार करून माध्यमानुसार आशय तयार करून तो प्रसारित करतात. बहुतेक पक्षांचा केवळ समाज माध्यमांसाठी काम करणारा स्वतंत्र आयटी विभागही कार्यरत आहे.

फेसबुक पेजना लाईक्स

राज्याचा विचार करता गोवा काँग्रेसच्या फेसबुक पेजला 3 लाख 61 हजार लाईक्स आहेत. भाजपला 1 लाख 39 हजार , आम आदमी पक्षाला 1 लाख 39 हजार, तृणमूलला 12 हजार, गोवा फॉरवर्डला 36 हजार, तर मगोपला 9.8 हजार लाईक्स आहेत.

भाजप

ट्विटर 65.5 हजार

इन्स्टाग्राम 12.7 हजार

यूट्यूब 675

डॉ प्रमोद सावंत
ट्विटर 98.1 हजार
इन्स्टाग्राम 62.2 हजार
यूट्यूब 4.3 हजार

काँग्रेस
ट्विटर 30.2 हजार
इन्स्टाग्राम 1807
यूट्यूब

गिरीश चोडणकर
ट्विटर 36.2 हजार
इन्स्टाग्राम 9200
यूट्यूब

आम आदमी पक्ष
ट्विटर 36.6 हजार
इन्स्टाग्राम 5394 हजार
यूट्यूब 1666

राहुल म्हांबरे
ट्विटर 3662 हजार
इन्स्टाग्राम 231
यूट्यूब

तृणमूल काँग्रेस
ट्विटर 15.7 हजार
इन्स्टाग्राम 975
यूट्यूब

लुईझिन फालेरो
ट्विटर 9600
इन्स्टाग्राम
यूट्यूब

गोवा फॉरवर्ड
ट्विटर 9679
इन्स्टाग्राम 513
यूट्यूब 1850

विजय सरदेसाई
ट्विटर 16,500
इन्स्टाग्राम 5153
यूट्यूब 1060

मगोप
ट्विटर
इन्स्टाग्राम
यूट्यूब

सुदिन ढवळीकर
ट्विटर 353
इन्स्टाग्राम 202
यूट्यूब

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news