दिल्ली प्रदूषण नियंत्रणातील तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम, BS-3 डिझेलसह BS-4 पेट्रोल वाहनांवरही बंदी

दिल्ली प्रदूषण नियंत्रणातील तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम, BS-3 डिझेलसह BS-4 पेट्रोल वाहनांवरही बंदी
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती पाहता श्रेणीबद्ध उपाय योजनांच्या तिसऱ्या टप्प्याचे नियम लागू ठेवण्यात आले आहेत. त्यासोबतच राष्ट्रीय महत्वाच्या गोष्टीशी संबंधित बांधकामाव्यतिरिक्त इतर बांधकामांना बंदी असुन बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल गाड्यांवर अजूनही बंदी असल्याची माहिती दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली आहे.

गेले काही दिवस दिल्लीतील प्रदूषणाची समस्या ही गंभीर झाली होती. दिवाळीच्या पूर्वी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होता. अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या पुढे गेला होता मात्र दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता काहीशी सुधारली होती. दरम्यान, वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस राजधानी दिल्लीत श्रेणीबद्ध उपाय योजनांच्या चौथ्या टप्प्याचे नियम लागू करण्यात आले होते. हवेची सुधारत असलेली गुणवत्ता पाहून श्रेणीबद्ध उपाययोजनांच्या चौथ्या टप्प्याचे नियम १८ नोव्हेंबरला काढण्यात आले होते.

दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय म्हणाले की,  "ज्या प्रकारे वाऱ्याचा वेग कमी आहे, शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की त्यात आणखी सुधारणा होऊ शकते. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत हवेची गुणवत्ता सुधारत नाही, तोपर्यंत दिल्लीत श्रेणीबद्ध उपाय योजनांच्या तिसऱ्या टप्प्याचे नियम दिल्लीत लागु राहतील. बांधकामांच्या बाबतीत राष्ट्रीय महत्वाच्या गोष्टीशी संबंधित बांधकामाव्यतिरिक्त इतर सर्व बांधकामांना बंदी असल्याची महत्वाची माहितीही गोपाल राय यांनी दिली."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news