Delhi MCD Exit Poll 2022 : दिल्लीत आपच्या झाडूने भाजप साफ?

Delhi MCD Exit Poll 2022 : दिल्लीत आपच्या झाडूने भाजप साफ?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीसाठी ४ डिसेंबरला ५०.७४ टक्के मतदान झाले. महापालिकेच्या २५० वार्डांमध्ये एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दिल्लीच्या जनतेने यावेळी कोणाला कौल दिला आहे? याचा निकाल ७ डिसेंबरला मतमोजणी झाल्यानंतरच समोर येणार आहे. मात्र, एक्सिट पोलमध्ये कोणी बाजी मारली आहे? हे जाणून घेऊयात…

महापालिका निवडणुकीत ३८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप आणि आपने सर्व २५० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर काँग्रेस पक्षाने २४७ जागा लढवल्या. याशिवाय जेडीयूने २३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. जेडीयू सोबतचं एमआयएमनेही १५ जागा लढवल्या आहेत. (Delhi MCD Exit Poll 2022)

इंडिया टुडेच्या एक्सिट पोलनुसार, भाजपला आपने मोठा धक्का दिला आहे. भाजपला फक्त ३४ टक्के महिलांनी मतदान केले आहे. तर ३६ टक्के पुरूषांनाही भाजपला मतदान केले आहे. तर महापालिका निवडणुकीत आप मोठे यश मिळवण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार, आपला ४६ टक्के महिलांनी मतदान केले आहे. तर ४० टक्के पुरूषांनीही आपला पसंती दिली आहे. (Delhi MCD Exit Poll 2022)

दिग्गज नेत्यांनी केले मतदान (Delhi MCD Exit Poll 2022)

दिल्लीच्या महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, इमरान हुसेन, काँग्रेसचे दिग्गज नेते अजय माकन आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन आदी नेत्यांनी मतदान केले. (Delhi MCD Exit Poll 2022)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news