Dalai Lama : चीन बौद्ध धर्म संपवण्याच्या प्रयत्नात, दलाई लामांचा मोठा आरोप

Dalai Lama : चीन बौद्ध धर्म संपवण्याच्या प्रयत्नात, दलाई लामांचा मोठा आरोप
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Dalai Lama : चीनने बौद्ध धर्माचे मोठे नुकसान केले. चीनमधील आमचे बौद्धविहार तर तोडलेच; आमच्या अनेक लोकांवर विषप्रयोगही केले. शनिवारच्या प्रवचनात हा गंभीर आरोप बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी केला. चीनने बौद्ध परंपरा अधोरेखित करणारी अनेक स्मारके, अनेक खुणा नष्ट केल्या; पण याउपर बौद्ध धर्म आपल्या जागेवर स्थिर आहे.

Dalai Lama :  दलाई लामा हे गेल्या तीन दिवसांपासून कालचक्र मैदानात प्रवचन देत आहेत. इनर मंगोलिया, तिबेटसह उर्वरित चीनमध्येही बौद्ध धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, पण चीन सरकारने यातील एक हजारावर बौद्ध प्रज्ञावंतांना टप्प्याटप्प्याने संपवून टाकले. चीन पद्धतशीरपणे बौद्ध धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु लोकांचा बुद्धावरील विश्वास चिरडून टाकू शकत नाही, असे दलाई लामा यांनी शनिवारी सांगितले.

कम्युनिस्ट सरकारने मार्चच्या सुरुवातीला पद्मसंभवाची मूर्ती पाडल्याचा उल्लेख त्यांनी केला, डिसेंबर 2021 नंतर अशा प्रकारची तिसरी घटना आहे. तर दुसरी घटना जानेवारी २०२२ पासून तिबेटच्या ड्रॅगो काउंटीमध्ये झाली होती. Dalai Lama

"बौद्ध धर्माचा नाश करण्याच्या प्रयत्नात, चीनमध्ये बांधलेले मठ पाडण्यात आले. आमच्या लोकांवर विषप्रयोग करण्यात आला. चीनने बौद्ध धर्माला हानी पोहोचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले," असे त्यांनी बोधगया येथे तीन दिवसीय शिकवणीच्या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी सांगितले.

Dalai Lama : असे असले तरी बुद्ध धर्म आपल्या जागी उभा आहे

"असे असूनही, बौद्ध धर्म आपल्या जागी उभा आहे. चीनमध्येही बौद्ध धर्माला मानणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. एखाद्याला इजा केल्याने कोणाचाही धर्म धोक्यात येत नाही. आजही चीनमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी भगवान बुद्धांसमोर प्रार्थना करण्यात मग्न आहेत." असे ते म्हणाले.

तसेच यावेळी लामा म्हणाले, भगवान बुद्धाच्या स्वरूपाचे स्मरणही चित्तशुद्धीसाठी पुरेसे ठरते, असे मतही लामा यांनी व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news