Gender Reassignment : कर्मचाऱ्यांना मिळणार लिंग बदलासाठी आर्थिक पाठबळ; भारतातील ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय

Gender Reassignment
Gender Reassignment

पुढारी ऑनलाईन डेस्क : कमिन्‍स इंडिया (Cummins India) या आघाडीच्‍या पॉवर सोल्‍यूशन्‍स तंत्रज्ञान प्रदाता कंपनी ने आज त्‍यांच्‍या कर्मचाऱ्यांसाठी जेंडर रिअसाइनमेंट सर्जरी (Gender Reassignment Surgery) सपोर्टची घोषणा केली. कमिन्‍स जीआरएस सपोर्टच्‍या माध्‍यमातून स्‍वत:ची ओळख दाखवणा-या लिंग बदलण्‍याचा निर्णय घेतलेल्‍या कर्मचाऱ्यांना त्‍यांच्‍या शस्‍त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य मिळेल. जग प्राइड महिना साजरा करत असताना कमिन्‍स इंडियाने एकजूटता, स्‍वयं-अभिव्‍यक्‍ती व समानता या मूल्‍यांना अंगिकारत एलजीबीटीक्‍यू+ समुदायासाठी आधारस्‍तंभ म्‍हणून पुढाकार घेतला आहे.

या घोषणेबाबत सांगताना कमिन्‍स इंडियाच्‍या (Cummins India) एचआर लीडर अनुपमा कौल म्‍हणाल्‍या, ''एक शतकाहून अधिक काळापासून कमिन्‍सने मुलभूत मूल्‍य म्‍हणून विविधता व सर्वसमावेशकतेचा अवलंब केला आहे, ज्‍यांचा आपल्‍यामधील भिन्‍नतेला प्रशंसित करण्‍याचा आणि एकमेकांना सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. आमच्‍या जेंडर रिअसाइनमेंट सर्जरी (Gender Reassignment Surgery) सपोर्टमधून ऐतिहासिकदृष्‍ट्या संधी नाकारण्‍यात आलेल्‍यांसह एलजीबीटीक्‍यू+ समुदायांसाठी अडथळ्यांना दूर करण्‍याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. आमचा इंडिया प्राइड एम्‍प्‍लॉयी रिसोर्स ग्रुप एलजीबीटीक्‍यू+ समुदायाच्‍या हक्‍कांसाठी व कल्‍याणासाठी सुरक्षित, समान व सर्वसमावशक कामकाज वातावरणाला चालना देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतो, जेथे त्‍यांना महत्त्‍व दिले जाण्‍यासोबत त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्‍यास प्रेरित व सक्षम केले जाते.''

कमिन्‍स इंडिया प्रगतीशील संस्‍कृतीला चालना देणाऱ्या कंपनीच्‍या विविधता, समता आणि समावेशन (डीई&आय) फ्रेमवर्कशी संलग्‍न होण्‍याकरिता आपल्‍या धोरणांचे वेळोवेळी मूल्‍यांकन करते. कंपनीने नुकतेच सर्व कमिन्‍स इंडिया कर्मचाऱ्यांसह पुरवठादार व कंत्राटदार कर्मचाऱ्यांसाठी त्‍यांच्‍या जेंडर -न्‍यूट्रल ड्रेस कोड पॉलिसीची घोषणा केली. सुधारित धोरण सर्वसमावेशक ड्रेस कोड मार्गदर्शकतत्त्वाची खात्री देते, जे बायनरी व नॉन-बायनरी अशा सर्व लिंगाच्‍या समस्‍यांचे निराकरण करते. तसेच कंपनीने आपल्‍या सुविधांमध्‍ये जेंडर न्‍यूट्रल वॉशरूम्सची अंमलबजावणी केली आहे, ज्‍यामधून सर्व लिंगांच्‍या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, विश्‍वसनीय व आरामदायी वातावरणाची निर्मिती करण्‍यात आली आहे. एलजीबीटीक्‍यू+ विविधता, समानता व सर्वसमावेशकतेला समर्थन देणारी कंपनी असल्‍याने ही धोरणे व उपक्रम लैंगिक रूढीवादीता वाढण्‍यास टाळण्‍याप्रती ते सतत समर्पितता दाखवतात.

२०१९ पासून कमिन्‍स इंडिया (Cummins India) आपल्‍या इंडिया प्राइड एम्‍प्‍लॉयी रिसोर्स ग्रुप (ईआरजी)च्‍या माध्‍यमातून सक्रियपणे एलजीबीटीक्‍यू+ प्राइड मंथ साजरा करत आहे. यंदा, कमिन्‍स इंडियाने पुण्‍यामध्‍ये युतक चॅरिटेबल ट्रस्‍टने आयोजित केलेल्‍या प्राइड मार्चमध्‍ये सहभाग घेतला. ईआरजीचे आपल्‍या कामाच्या ठिकाणी व समुदायांमधील एलजीबीटीक्‍यू+ व्यक्तींना समर्थन देण्‍यासोबत सक्षम करण्यासाठी सुरक्षित, समान आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्‍याची, त्‍यांचा सल्‍लागार असण्‍याची, एलजीबीटीक्‍यू+ हक्‍क व एकूण कल्‍याणाला चालना देण्‍याचे मिशन आहे. कमिन्‍स इंडियाच्‍या मुख्य माहिती अधिकारी अन्‍नपूर्णा विश्‍वनाथन या ईआरजीच्‍या प्रायोजक आहेत. ईआरजीने अंमलबजावणी केलेले काही प्रमुख उपक्रम आहेत प्राइड अॅली प्रोग्राम, नो थाय प्रोनाऊन्‍स मोहिम. एलजीबीटीक्‍यू+ १०१ ट्रेनिंग व सेफ लीडर ट्रेनिंग यांचा कर्मचाऱ्यांना एलजीबीटीक्‍यू+ समावेश, पूर्वाग्रह, व सुरक्षित लीडर परिस्थिती पद्धतींबद्दल शिक्षित व जागरूक करण्‍यासाठी, सहयोग निर्माण व प्रोत्साहन देण्यासाठी, प्रत्येकासाठी कामाच्या ठिकाणी आदर निर्माण करण्यासाठी अवलंब करण्‍यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news