Corona Prevention Meeting : कोरोना संसर्गाबाबत सतर्क, सावध रहा; आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय

Corona Prevention Meeting : कोरोना संसर्गाबाबत सतर्क, सावध रहा; आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जगातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी उच्च स्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत नीती आयोगाचे सदस्य डॉ.वी. के. पॉल यांच्यासह कोरोना वर्किंग ग्रुप प्रमुख डॉ. एन. के. अरोड, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल, जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले तसेच डीजीएचएस आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाचे डॉ. अतुल गोयल उपस्थित होते.

कोरोना संसर्ग अद्यापही पुर्णत: गेला नसल्याने सर्वांनी सतर्क आणि सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे मांडविया म्हणाले. काही देशात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता तज्ञ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देशातील स्थितीचा आढावा घेतला.देश कुठल्या स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे ट्विट बैठकीनंतर मांडविया यांनी केले.तर, डॉ.पॉल यांनी कोरोना लसीकरणातील तिन्ही डोस आवश्यक असून सर्वांनी लसी घ्यावी,असे आवाहन केले. देशातील केवळ २७ ते २८ टक्के नागरिकांनीच खबरदारी म्हणून बूस्टर डोस घेतला आहे. पात्र वयोगटातील विशेषत: वृद्धांनी बूस्टर डोस घेण्याचे आवाहन यानिमित्ताने डॉ.पॉल यांनी केले. हा डोस बंधनकारक असून सर्वांना यासंबंधीचे निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले. वर्दळीच्या ठिकाणी अथवा घरात मास्कचा वापर करण्याचे आवाहन पॉल यांनी केले. सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रामुख्याने मास्कचा वापर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान राजधानी दिल्लीत कोरोना संसर्ग ग्रस्तांची जीनोम सीक्वेंसिंग पुन्हा सुरू करण्यात आली आहे. केंद्राच्या आदेशानंतर लोकनायक तसच आयएलबीएस रुग्णालयात जीनोम सिक्वेंसिंग करीता संसर्गग्रस्तांचे नमुने एकत्रित केले जात आहेत.देशात कोरोनाचा नवीन व्हेरिंयट आला आहे का? याचा शोध घेण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. जापान, दक्षित कोरिया, ब्राझील, चीन तसेच अमेरिकेत कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेची बाब ठरत आहे. यापूर्वीच जीनोम सिक्वेंसिंग साठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा सातत्याने तपासणी केली जात आहे. कोरोनाप्रभावित देशातून येणार्या प्रवाशांची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.तपासणीदरम्यान कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना विलगिकरणात पाठवण्यात येईल.

Corona Prevention Meeting : दरम्यान, चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा भयानक उद्रेक झाला आहे. कोरोनामुळे मृतांची संख्या इतकी वाढली आहे की स्मशानभूमीत प्रेतांचा खच पडला असून अंत्यसंस्कारासाठी प्रेतांची रांग लागली आहे. चीन हा भारताचा शेजारी देश आहे. त्यामुळे चीनच्या परिस्थितीवरून भारतात आधीच खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कालच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. तसेच यासंदर्भात लवकरच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. या बैठकीत साधारण कोण-कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे याविषयी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी वृत्त वाहिन्यांशी बोलताना माहिती दिली आहे.

Corona Prevention Meeting : जगभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाय योजना करणार – भारती पवार

कोरोनाचे संकट 2019-20 मध्ये संपूर्ण जगभर पसरल्यानंतर भारताने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती उल्लेखनीय आहे. भारताने वेगाने लसीकरणाची मोहीम राबवत 200 कोटींचा टप्पा गाठला आहे. लसीकरण उत्तमप्रकारे झाल्याने आपल्याकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटले आहे.

Corona Prevention Meeting : तसेच आजच्या उच्चस्तरीय बैठकीत जगभरातील कोरोनाची परिस्थिती तेथील उपाययोजना परिस्थिती आणि भारतातील कोरोनाची परिस्थिती इत्यादी बाबींचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जिनोम सिक्वेंसिंगचे आदेश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत, असे पवार यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news