रशियन वटवाघळांमध्ये आढळला कोरोना सारखा ‘खोस्टा 2’ विषाणू, मानवी शरीरात होऊ शकतो शिरकाव…

रशियन वटवाघळांमध्ये आढळला कोरोना सारखा ‘खोस्टा 2’ विषाणू, मानवी शरीरात होऊ शकतो शिरकाव…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : संपूर्ण जग नुकतेच कोविड 19 विषाणूच्या विळख्यातून सावरले आहे. तोच आणखी एक धक्कादायक संशोधन समोर आले आहे. शास्त्रज्ञांना रशियातील वटवाघळांमध्ये SARS-CoV-2 सारखा खोस्टा 2 हा नवीन विषाणू आढळला आहे. शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार हा विषाणू मानवी शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करू शकतो आणि हा संसर्गजन्य विषाणू आहे. तसेच या विषाणूवर कोविड लस प्रभावी ठरू शकत नाही. हा विषाणू सध्याच्या कोविड लसाला प्रतिरोधक ठरतो. संशोधकांच्या एका चमूला असे आढळून आले की खोस्टा-2 नावाच्या वटवाघळाच्या विषाणूचे प्रथिने मानवाच्या पेशींमध्ये प्रवेश करू शकतात.

या संशोधनामुळे शास्त्रज्ञांनी एकच सार्वत्रिक लस विकसित करण्याची गजर व्यक्त केली. जी सर्व प्रकारच्या जीवजंतूंवर परिणामकारक ठरेल.

"आमचे संशोधन पुढे दाखवते की सर्बेकोव्हायरस आशियाच्या बाहेरील वन्यजीवांमध्ये पसरत आहेत, अगदी पश्चिम रशियासारख्या ठिकाणी जेथे खोस्टा-2 विषाणू आढळले होते, ते जागतिक आरोग्यासाठी आणि SARS-CoV-2 विरुद्ध सुरू असलेल्या लस मोहिमांनाही धोका निर्माण करतात," असे मिरर यूके वॉशिंग्टनने आपल्या वृत्तात एका विषाणू शास्त्रज्ञाचे म्हणणे प्रसिद्ध केले आहे.

"अनुवांशिकदृष्ट्या, हे विचित्र रशियन विषाणू जगभरात इतरत्र सापडलेल्या काही इतरांसारखे दिसत होते, परंतु ते SARS-CoV-2 सारखे दिसत नसल्यामुळे, कोणालाही ते खरोखरच उत्साही होण्यासारखे काही वाटत नव्हते," अशी माहिती विषाणूच्या संशोधकांनी दिली आहे.
2020 मध्ये रशियन वटवाघळांमध्ये खोस्टा-1 आणि खोस्टा-2 विषाणू सापडले होते. तथापि, प्राथमिक तपासणीत असे सूचित केले गेले की ते मानवी शरीरासाठी धोकादायक नाहीत. नंतर, चाचण्यांमध्ये दिसून आले की खोस्टा -2 या विषाणूला सध्याच्या कोविड लसींच्या सीरम आणि परिणामांद्वारे ब्लॉक केला जाऊ शकत नाही.

काही ठळक मुद्दे
  • कोविड सारखा खोस्टा 2 विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करू शकतो.
  • हा विषाणू कोविड लसींना प्रतिरोधक आहे.
  • रशियन वटवाघळांमध्ये खोस्टा 2 विषाणू आढळून आला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news