ठाणे : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणात नसून त्यामुळे काँग्रेसची फरफट सुरू आहे, त्यामुळे पक्षात अनेक कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत राजू वाघमारे यांनी व्यक्त केला. राजू वाघमारे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.