पुढारी ऑनलाइन डेस्क : Condemning Hinduphobia : अमेरिकेत गेल्या काही दिवसात हिंदू विरोधी फोबिया, द्वेष आणि हिंदू लोकांना ठरवून लक्ष्य करण्याचे प्रकार वाढले आहे. या विरुद्ध अमेरिकेतील एका राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या हिंदूफोबियाचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे. अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने हा ठराव संमत केला आहे. असा ठराव पास करणारे जॉर्जिया हे अमेरिकेतील पहिलेच राज्य ठरले आहे.
जॉर्जिया हे युनायटे़ड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील मोठे राज्य आहे. जॉर्जियाच्या विधानसभेने पहिल्यांदाच हिंदूफोबियाचा निषेध करणारा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे हिंदू धर्मीयांचे रक्षण आणि समर्थनार्थ अशा प्रकारचा ठराव आणणारे अमेरिका हे पहिलेच राज्य बनले आहे.
हिंदूभिमानी आणि हिंदूविरोधी कट्टरतेचा निषेध करत ठरावात म्हटले आहे की, हिंदू धर्म हा जगातील एक मोठा आणि सर्वात जुना धर्म आहे ज्याचे १०० हून अधिक देशांमध्ये १.२ अब्ज अनुयायी आहेत आणि त्यात स्वीकार, परस्पर आदर आणि शांतता या मूल्यांसह विविध परंपरा आणि विश्वास प्रणालींचा समावेश आहे.
जॉर्जियामधील सर्वात मोठ्या हिंदू आणि भारतीय-अमेरिकन समुदायांपैकी एक असलेल्या अटलांटा उपनगरातील फोर्सिथ काउंटीमधील प्रतिनिधी लॉरेन मॅकडोनाल्ड आणि टॉड जोन्स यांनी हा ठराव मांडला होता.
ठरावात असे नमूद केले आहे की, अमेरिकन-हिंदू समुदायाने वैविध्यपूर्ण क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले आहे. जसे की वैद्यक, विज्ञान आणि अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, आदरातिथ्य, वित्त, शैक्षणिक, उत्पादन, ऊर्जा, किरकोळ व्यापार इत्यादींमध्ये या समुदायाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. याशिवाय योग, आयुर्वेद, ध्यान, भोजन, संगीत, कला या समुदायाच्या योगदानाने सांस्कृतिक फॅब्रिक समृद्ध केले आहे आणि अमेरिकन समाजात मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेले आहे आणि लाखो लोकांचे जीवन सुधारले आहे, असेही त्यात नमूद केले आहे.
देशाच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दशकांमध्ये हिंदू-अमेरिकन लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ठरावात असे म्हटले आहे की हिंदू धर्माच्या विध्वंसाचे समर्थन करणाऱ्या आणि त्याच्या पवित्र ग्रंथांवर आणि सांस्कृतिक पद्धतींवर हिंसाचार आणि दडपशाहीचा आरोप करणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील काही व्यक्तींमुळे हिंदूफोबिया वाढला आहे आणि संस्थात्मक बनला आहे.
कोलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (CoHNA) च्या अटलांटा चॅप्टरने, असा ठराव आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी 22 मार्च रोजी जॉर्जिया स्टेट कॅपिटल येथे आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या हिंदू अॅडव्होकेसी डेचे आयोजन केले होते. यावेळी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स असे सुमारे 25 खासदार उपस्थित होते. ते हिंदू समुदायाच्या समस्या समजून घेण्यासाठी सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी भेदभावापासून समुदायाचे रक्षण करण्याचे मार्ग तयार करण्याची आणि राज्यातील महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत हिंदू आवाजांचा समावेश सुलभ करण्याचे वचन दिले.
CoHNA चे उपाध्यक्ष राजीव मेनन म्हणाले, "रिप मॅकडोनाल्ड आणि रेप जोन्स तसेच इतर कायदेकर्त्यांसोबत काम करणे हा खरा सन्मान होता ज्यांनी हा काउंटी ठराव मंजूर होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला मार्गदर्शन केले.
हे ही वाचा :