MP Kalyan Banerjee : उपराष्ट्रपतींची नक्कल भोवणार : कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल

MP Kalyan Banerjee : उपराष्ट्रपतींची नक्कल भोवणार : कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपराष्ट्रपती तथा राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्याविरोधात एका वकिलाने दिल्लीच्या डिफेंन्स कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. MP Kalyan Banerjee

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करणारे तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, नक्कल करणे ही एक कला आहे. मला अध्यक्षांबद्दल पूर्ण आदर आहे. कुणालाही दुखावण्याचा किंवा अवमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. MP Kalyan Banerjee

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या घटनेबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, जे काही झाले ते संसद भवनाबाहेरील प्रकरण आहे. त्याचवेळी पत्रकारांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी या मुद्द्यावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचे सांगितले.

हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलेले विरोधी पक्षांचे खासदार संसद परिसरात निदर्शने करत होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत गांधी पुतळ्यासमोर धरणेही धरले. यानंतर ते संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चर्चा करत होते. त्यावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली. या कृतीवर उपराष्ट्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Jagdeep Dhankhar

ही कृती लज्जास्पद असल्याचे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले की, एक खासदार माझी खिल्ली उडवत आहेत. आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हिडिओ बनवत आहे, हे हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. खालच्या पातळीवर उतरण्याला कोणतीही मर्यादा नाही. एक मोठा नेता खासदाराच्या असंसदीय वर्तनाचे व्हिडीओ चित्रिकरण करतो. सर्वांपेक्षा मोठे नेते आहेत. त्यांना सद्बुद्धी यावी, असा टोला त्यांनी लगावला. या कृतीमुळे माझी अवहेलना झाली आहे. माझ्या पदाची खिल्ली उडवली गेली. माझ्या कृषी पार्श्वभूमीची खिल्ली उडवली गेली, अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी आपला संताप व्यक्त केला. Jagdeep Dhankhar

जेव्हा टीएमसीचे खासदार मिमिक्री करत होते. तेव्हा राहुल गांधी, प्रमोद तिवारी, जयराम रमेश, मनोज झा, डी राजा, कार्ती चिदंबरम असे अनेक ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news