अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

पुढारी ऑनलाइन डेस्क : कॉंग्रेस अध्यक्षांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वकील विनित जिंदल यांनी केली आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि केजरीवाल यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जातीचा उल्लेख करीत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.जिंदल यांनी यासंबंधी दिल्लीचे पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.अद्याप उभय नेत्यांविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.अशात या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलीस गुन्हा दाखल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खरगे यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन् समारंभाचे निमंत्रण राष्ट्रपतींना न दिल्याने सरकारवर टीकास्त्र सोडले होते.खरगेंनी लागोपाठ ४ ट्विट करीत केवळ निवडणुकीसाठी मोदी सरकारकडून दलित आणि आदिवासी समाजातून राष्ट्रपती बनले जातात.संसदेच्या नवीन इमारतीच्या शिलान्यास समारंभात तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बोलावण्यात आले नाही. आता उद्घाटन सोहळ्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले नाही,असे ट्विट खरगे यांनी केले होते.

तर,भाजप अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा अपमान करीत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता.राम मंदिराच्या शिलान्यास सोहळ्यात तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांना बोलावण्यात आले नव्हते.नवीन संसदेच्या शिलान्यास कार्यक्रमात ही कोविंद यांना बोलावण्यात आले नाही.आता विद्यमान राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन संसदेचे उद्घाटन करण्यात येत नाह,असे ट्विट केजरीवाल यांनी केले होते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news