सामूहिक प्रयत्नांनी भारत वैश्विक आर्थिक शक्ती बनेल : पीयूष गोयल

सामूहिक प्रयत्नांनी भारत वैश्विक आर्थिक शक्ती बनेल : पीयूष गोयल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारत सामूहिक प्रयत्नांनी वैश्विक आर्थिक शक्ती बनेल, असे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी आंध्रप्रदेश येथे व्यक्त केले. ते आंध्र प्रदेशच्या काकीनाडामध्ये भारतीय विदेश व्यापार संस्थान (IIFT) परिसराच्या उद्घाटनप्रसंगी मख्य अतिथी म्हणून बोलत होते.

पियूष गोलय म्हणाले, भारतीय वाणिज्यला जगात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त करण्यासाठी मानव संसाधनाच्या विशेष प्रबंधनाची आवश्यकता आहे. जे IIFT च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येईल. हा नवीन परिसर नवीन अध्यायाच्या सुरुवातीचे प्रतीक असेल. राजनीतिक स्थिरता, उच्च प्रतिस्पर्धा, सामूहिक प्रयत्न आणि विकासशील आर्थिक प्रणाली सह जगात भारत एक आर्थिक शक्ति बनेल. वर्तमान में भारतीय अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलयन डॉलर इतकी आहे. एका विकसनशील देशाला एकीकृत आणि आर्थिक विकास आणि सामूहिक प्रयत्नांतून विकसित देशाच्या स्तरावर नेता येऊ शकते. असे गोयल म्हणाले.

नित्य प्रयत्नांनी भारताची अर्थव्यवस्था पुढील 25 वर्षांत म्हणजेच 2047 पर्यंत 10 पट वाढीस लागेल. 2047 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी अधिकाधिक मनुष्यबळाचा पुरवठा करून विकास प्राप्त केला जाईल.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत केलेल्या नियोजनातून आर्थिक व्यवस्था दृढ

मार्गदर्शन करताना गोयल पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारताअंतर्गत केंद्र सरकार द्वारा केले गेलेले कार्य आणि बजट यांच्या विशेष वाटपामुळे देशाची आर्थिक व्यवस्थेला मजबूत आणि समृद्ध बनवते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news