राज्यात पुन्हा थंडी; २१ फेब्रुवारीपासून पुन्हा किमान तापमानात घट

File Photo
File Photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील किमान व कमाल तापमानात वाढ सुरू झालेली असताना पुन्हा तीन दिवस थंडी (Cold Wave) अनुभवता येणार आहे. 21 ते 23 फेब्रुवारी या काळात राज्यातील वातावरणात हा बदल दिसेल.

उत्तर भारतात पुन्हा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हवेच्या वरच्या थरांतील झोतवाऱ्याचा वेग ताशी 250 इतका झाला आहे. त्यामुळे काश्मीरपासून पंजाब, दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश पर्यंतच्या भागात थंडीचा कडाका वाढणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर 21 पासून होईल. राज्यात 23 फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होईल. कमाल तापमान वाढेल पावसाचा मात्र अंदाज नाही.

रविवारचे कमाल व किमान तापमान

पुणे 35.1(15.5), अहमदनगर 35.1( 17.7), जळगाव 36.2 (17.7), कोल्हापूर 34.6( 19.2), महाबळेश्वर 29.5 (17.5), नाशिक 34.3(15.7),सांगली 35.6 ( 17.2), सातारा 35.6 ( 15.9), सोलापूर 34.6 ( 18.5), मुंबई 32.4 ( 22), छत्रपती संभाजीनगर 34.2 ( 17.6),परभणी 36.5 ( 19),अकोला 34.2,( 20.2),अमरावती 34.4( 20.3)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news