CNG : सीएनजी २.५० रुपयांनी स्वस्त

CNG : सीएनजी २.५० रुपयांनी स्वस्त

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, बुधवारी १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या देशाच्या नव्या अर्थसंकल्पात काय महाग, काय स्वस्त होणार याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला असताना मुंबई आणि महानगरातील नागरिकांना महानगर गॅसने स्वस्ताईची गुड न्यूज दिली. १ फेब्रुवारीपासूनच सीएनजीच्या CNG दरात अडीच रुपयांची कपात करण्यात आली आहे. मुंबईत आता ८९ रुपये ५० पैसे किलोने मिळणारा सीएनजी आता ८७ रुपयांना मिळेल.

महानगर गॅसने गेल्या नोव्हेंबर महिन्यात सीएनजीच्या CNG दरात ३.५० रुपयांनी वाढ केली होती. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या किमती ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे २०२२-२३ या वर्षात सीएनजीच्या वापरात घट झाली होती. मात्र, आता महानगर गॅसने सीएनजीच्या दरात २.५० रुपयांनी कपात करून वाहनधारकांना मोठा दिलासा दिला. मुंबईत ८९ रुपये ५० पैसे प्रति किलो दराने सीएनजी मिळत होता. त्यात कपात करण्यात आली आहे. सध्याचा सीएनजीचा दर हा पेट्रोल-डिझेलपेक्षा ४४ टक्क्यांनी कमी आहे.

भाडेवाढीनंतर दरकपात CNG

महानगर गॅसकडून मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जातो. त्यामुळे या दरकपातीचा फायदा मुंबईलगतच्या अन्य भागांनाही होईल. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना सीएनजी हा वाहनधारकांसाठी तुलनेत स्वस्त पर्याय होता. परंतु, पेट्रोल- डिझेलच्या बरोबरीने सीएनजीचे दरही वेगाने वाढत होते. याचा थेट फटका टॅक्सी व रिक्षाचालकांना बसला होता. मुंबईत सुमारे सव्वा लाख रिक्षा, ३५ हजार टॅक्सी आणि बेस्टच्या बस सीएनजींवर धावतात. तसेच खासगी चारचाकीदेखील सीएनजीवर चालतात. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने १ ऑक्टोबर २०२२ पासून रिक्षाला २, तर टॅक्सीच्या भाडेदरात ३ रुपयांची वाढ देण्यात आली. आता सीएनजीच्या दरात कपात केल्याने वाढवलेले भाडे कमी होणार का, असा प्रश्न आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news