![Taliban-CIA : अमेरिकेच्या गुप्तहेर प्रमुखाची तालिबान्यांशी गुप्त बैठक](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F08%2Fbarns.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे (CIA) प्रमुख विल्युम जे बर्न्स यांनी २३ ऑगस्टला तालिबानचा वरिष्ठ नेता मुल्ला गनी बरादरची भेट घेतली. ही महत्वपूर्ण बैठक अफगाणिस्तानच्या राजधानीत म्हणजेच काबूल येथे घेण्यात आली. अमेरिकेतील अधिकाऱ्यांची नावे न छापण्याच्या अटीवर वाॅशिंग्टन पोस्टने ही माहिती दिली आहे.
१५ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी वर्चस्व स्थापन केल्यानंतर परिस्थिती बिघडत चालली आहे. मोठ्या प्रमाणात लोक देश सोडून जात आहेत. त्याशिवाय काबूल विमानतळावर आपापल्या देशाकडे परतण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमत आहेत. या विमानतळावर लोकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे सैनिक तैनात आहेत.
अमेरिकेच्या सैनिकांच्या म्हणण्यानुसार काबूल विमानतळावरून वेगवेगळ्या देशांमध्ये विमानांचं उड्डाण होत आहे. ४०० हून जास्त भारतीय नागरिक अफगाणिस्तानमधून भारतात परतले आहे. असं असूनही मोठ्या प्रमाणात काबूल विमानतळावर लोक अडकून पडलेले आहेत.
पहा व्हिडीओ : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर